Ads
बातम्या

शिवसैनिकांची आशिष शेलारांविरोधात होर्डिंगबाजी!

ashish shelar
डेस्क desk team

नालासोपारा येथील एका सभेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक टिका केली होती. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकानी आशिष शेलार यांच्या विरोधात आंदोलन करत होर्डिंगबाजी केली आहे.

होर्डिंगमध्ये काय? 

शिवसेनेने जागोजागी लावलेल्या या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आले आहे. तर त्याचबरोबर ‘आ’शिषे’ मे देख’ असा मजकूरही छापण्यात आला आहे.भाजप नेते राज पुरोहित यांच्या कार्यालयासमोर होर्डिंगबाजी करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते आशिष शेलार? 

नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या भूमिकेला एका मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठींबा देण्यास नकार दिला होता. यासंदर्भात बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली. ते म्हणाले होते की, शिवसेनेने सीएए विषयी आपली भूमीका बदलली आहे. सीएए महाष्ट्रात लागू देणार नाही, तुझ्या बापाच राज्य आहे का? हा केंद्राचा कायदा आहे. अभ्यास करता येत नसेल तर माझ्यासारखे वकील खूप आहे, अशी टिका केलेली.

त्यानंतर आशिष शेलार यांनी त्यांची भूमीका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाला असंवैधानिक वाटत असेल, त्रास झाला असेल, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला, माफी मागायला माझी काहीही अडचण नाही. पण माझा रोख हा शिवसेनेसाठी नव्हता. कारण उद्धव ठाकरेंनी त्यांची सीएएविषयीची भूमिकाच अजून जाहीर केलेली नाही. माझ्या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दिशेने होता’.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: