बोर्डाची परिक्षा म्हटले की विद्यार्थी आणि पालकांनमध्ये टेन्शनच वातावरण निर्माण होतो. अवघ्या काही दिवसांवर 12 वीची तर महिन्यावर 10 वीची परिक्षा येऊन ठेपली आहे. सर्व घरांमध्ये आता परिक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांचा अभ्यास झाला असून आता वेळ आहे उजळणीची. मात्र, काही वेळा घरचे वातावरण ताणावलेले असेल तर मुलांना अभ्यास करण्यास रूची राहत नाही. त्यामुळे आज आम्ही पालकांनी आपल्या मुलांना ताणमुक्त ठेवण्यासाठी काय करावे हे सांगणार आहोत.
>> स्वत: पालक मुलांच्या परिक्षेचे ताण घेताना दिसतात. मात्र, आपल डोकं शांत ठेवून सकारात्मक विचार करून आपल्या मुलांना परिक्षेचे आलेले ताण घालवण्यास मदत करू शकाल. तसेच स्वत: शांत राहिला तर मुलांनाही शांत आणि ताणमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकता.
>> अनेक पालक नकळत आपल्या पाल्याची इतर पाल्यांसोबत तुलना करता. मात्र, सगळ्यात जास्त आपल्या पाल्याचा आत्मविश्वास तुलनेने कमी होतो. त्याची कोणासोबत तरी तुलना करण्यापेक्षा त्या प्रोत्साहन द्या त्याच्यावर विश्वास दाखवा.
>> काही वेळा मुलांचे अभ्यासा व्यतिरिक्त स्मार्टफोन, सोशल मीडियाकडे लक्ष विचलीत होते आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष. मात्र, यावेळी त्यांना लेक्चर देऊ नका तर त्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगा.
>> पालक हे मुलांसाठी सपोर्टसिस्टिमची भूमिका पार पाडत असतात. जेव्हा अभ्यासात एखादी गोष्ट अडल्यास त्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्या आसपास राहा. मात्र, सतत त्यांच्या मागे राहुन लुडबुड करू नका. याने मुलांचे लक्ष विचलीत होऊ शकते.
>> अनेकवेळा घरात काही समारंभ असल्यास तो दिवस अभ्यासाशिवाय निघून जातो. मात्र, अशा वेळी मुलांचे नियमित रूटिंग तयार करा. त्यांच्या उठण्याची वेळ, अभ्यासाची वेळ, खाण्याची वेळ, तसेच अभ्यासातून ब्रेक घेण्याची वेळ याची निश्चिती करा. तसेच त्याना सकाळी हेल्दी नाश्ता द्या. त्याचबरोबर त्यांचे रूटींग चूकणार नाही याकडे लक्ष असणे गरजेचे आहे.
>> पालकमुलांना सतत अभ्यास कर, अभ्यास कर असे सांगत असतात. मात्र, त्यांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी अभ्यासातून थोडावेळ ब्रेक घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याना आराम मिळेल आणि त्यांचे ताण घालवण्यासाठी थोडावेळ ब्रेकसाठी काढू द्या.
>> सतत अभ्यास करत राहून चांगले गुण मिळावेत यासाठी पालक मुलांच्या मागे लागतात. मात्र, असे केल्याने नकारात्मक विचार मुलांच्या मनात निर्माण होऊन परिक्षेचे ताण निर्माण होते. त्यामुळे असे न करता त्यांच्यासमोर नेहमीच सकारात्मक विचार ठेवा. त्यांच्या मनावर कोणताही दबाब आणू नका.
यंदा बारावीची परिक्षा 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 पर्यंत असणार आहे. तर दहावीची परिक्षा 3 मार्च 2020 पासून सुरू होणार असून 23 मार्च 2020 पर्यंत असणार आहे.