Ads
टेक- टॉक

Mi Super Sale; ‘या’ स्मार्टफोन खरेदीवर दमदार सूट

mi brand
डेस्क desk team

शाओमी या लोकप्रिय कपंनीच्या ‘Mi.com’ वर ‘Mi Super Sale’ सुरू झाला आहे. शाओमीने या सेलमध्ये आपल्या स्मार्टफोनवर तब्बल 4 हजारांचा डिस्काउंट दिला असून हा सेल येत्या 7 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यात सेलमध्ये ‘Redmi Note 8 pro’, ‘Redmi Note 7 pro’ आणि ‘Redmi K20’  सीरिजच्या स्मार्टफोन खरेदीवर जबरदस्त सूट देण्यात आली आहे.

Redmi Note 8 pro

या स्मार्टफोनची किंमत कमी केली नसून एक्सचेंज ऑफरवर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनवर 1 हजारांची अतिरिक्त सूट देण्यात आलीय.

Redmi Note 7 pro

सेलमध्ये या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन 9 हजार 999 रूपये, 6 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेजचा फोन 10 हजार 999 रुपयात, 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजचा फोन 13 हजार 999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.

Redmi K20  

शाओमाच्या या जबरदस्त स्मार्टफोनच्या किंनतीत 2 हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. K20 च्या 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजचा मॉडेल 22 हजार 999 रुपयांत खरेदी करण्याची संधी आणि एक्सचेंज असल्यास 2 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

Redmi K20 Pro चा 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनवर 3 हजार रुपयांची सूट मिळणार असल्याने हा फोन 24 हजार 999 रुपयांत मिळेल.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: