Ads
बातम्या

वसई-विरारचा वीजपुरवठा बंद

power
डेस्क desk team

नालासोपारा पूर्वेतील धानीवबाग २२०/२२ केव्ही अति उच्चदाब उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेमुळे महावितरणाने तांत्रिक बिघाडीची दुरुस्ती हाती घेतल्याने काही दिवसांसाठी वसई-विरार शहरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणाने दिली आहे.

महापारेषण कंपनीच्या नालासोपारा पूर्वेतील धानीवबाग २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाली होती. हि बिघाड दुरुस्त करण्यासाठी चार ते पाच दिवसाचा कालावधी लागणार असल्याने महावितरणाने रोहित्रावरील वीज ग्राहकांचा वीजभार इतर दोन रोहित्रांवर फिरवला आहे. त्यामुळे वीजभार हलका करण्यासाठी वसई, विरार व नालासोपारा येथील काही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस वीजपुरवठा गरजेनुसार आळीपाळीने बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरण आवश्यकतेनुसारच वीज बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच येत्या चार-पाच दिवसात दुरुस्ती होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईल असे आश्वासन वीज ग्राहकांना देण्यात आले आहे.

वीजपुरवठा बंद  

नालासोपारा पूर्वेतील २२०/२२ केव्ही उपकेंद्रांतर्गत संतोष भुवन, वलईपाडा, बावशेत, तांडोपा, गौराईपाडा भागातील वीज सकाळी ८ ते १०:३० दरम्यान बंद असेल. तुळींज, विजयनगर, रहमतनगर, नगिनदास, बिलालपाडा भागातील वीजपुरवठा सकाळी १०:३० ते १२:३० या वेळात बंद राहणार आहे. तसेच प्रगतीनगर, महेश पार्क भागातील वीजपुरवठा सकाळी ९ ते ११.३० पर्यत बंद राहील.

विरारच्या २२/२२ केव्ही नारींगी उपकेंद्रांतर्गत साईनाथनगर, जीवदानी रोड, विहार इंडस्ट्रीज, गोपचार भागातील वीजपुरवठा सकाळी १२.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तारांगण, फुलपाडा रोड, सहकार नगर परिसरातील सुमारे ३३ हजार ग्राहकांची वीज बंद राहील. २२/२२ केव्ही पारोळ उपकेंद्रांतर्गत खानिवडे, सकवार, चांदीप, पारोळ, वज्रेश्वरी, गणेशपुरी भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. २२/२२ केव्ही नाईकपाडा उपकेंद्रांतर्गत तुंगारेश्वर रोड, नाईकपाडा, रेमी परिसरातील वीजपुरवठा बंद असेल.

शिवभीम नगर, सातिवली नाका, बजरंग ढाबा ते सातिवली हायवे भागातील वीजपुरवठा ७.३० ते रात्री ८वाजेपर्यंत बंद असेल. २२/२२ केव्ही पोमण उपकेंद्रांतर्गत कामणगाव, पोमनगाव, देवतळ, केआयडीसी, डोंगरीपाडा, मोरी, नागले, शिलोत्तर भागात रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान बंद राहील. २२/२२ केव्ही शिरगाव उपकेंद्रांतर्गत वैतरणा, डोलीव, कोशिंबे, खर्डी भागात दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: