महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रसाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या नोकर भरतीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) साठी 2 जागा, डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण) साठी 10 जागा, कनिष्ठ सहाय्यक (खाते) साठी 8 जागा, कनिष्ठ सहाय्यक (HR) साठी 6 जागा, उपकेंद्र सहाय्यक साठी 19 जागा आणि विद्युत सहाय्यक साठी 37 जागा अशा एकूण 82 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: BE/ B.Tech (इलेक्ट्रिकल).
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.3: (i) B.COM./ BMS/ BBA (ii) MS-CIT.
- पद क्र.4: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा व्यवस्थापन पदवी किंवा समकक्ष पात्रता (ii) MS-CIT.
- पद क्र.5: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री डिप्लोमा.
वयोमर्यादा
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.6: 18 ते 27 वर्षे
- मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट
शुल्क आणि परिक्षा
1 ते 4 या पदांसाठी 250 रूपये तर 5 आणि 6 पदासाठी 60 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. तसेच या भरतीसाठी घेण्यात येणारी परिक्षा फेब्रुवार/मार्च 2020 ला असणार आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा