मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोड्याच्या शर्यतील लावून सट्टा खेळणाऱ्या टोळीला पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने कारवाई केली. या कारवाईत 7 टांग्यासह 14 घोड्यासह 18 सट्टेबाजांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 21 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वसई हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे बाफाना गावाच्या हद्दीतील हॉटेल वेलकम हॉटेल ते घोडबंदर ब्रिजपर्यंत रस्ता बंद करून घोड्यांच्या शर्यती लावल्या जात होत्या. या शर्यतीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला 1000 रुपयांची फी आकारण्यात आली होती. पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वसई टीमला याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून कारवाई केली गेली.
या छाप्यामध्ये तुषार जानु माळी(35), क्रिस डॉनल मेन्डोसा (18), एड्रीयन रफेल पिंटो (36), क्लिंट ब्रेवेन रोड्रिक्स (48), बेस्वल नेपोल घोन्साल्वीस(36), सॅम्युअल स्टीफन मिरांडा (24), रॉनी बोना परेरा (31), शाखीर समीर खान (23), पंकज नंदलाल यादव(21), पॉल सनी जॉन (55), एडरल पास्कोल गोम (53), भास्कर रामू वेश(20), शंकरकुमार लकी खतबे (24), शेल्डन सॅर्डीक कोयलो (19), मोजेस मेंडोसा, रेनल टेक्सीरा अशा 14 हायप्रोफाईल सट्टेबाजांना अटक करण्यात आली.
या सट्टेबाजाकडून 7 टांग्यासह 14 घोडे, घोड्यांची वाहतूक करणारा टेम्पो, दोन दुचाकी, पाच चाबुक असा एकूण 21 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यामध्ये 41 जणांना साक्षीदार बनविले असून 14 हायप्रोफाईल सट्टेबाजांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.