Ads
बातमीदार स्पेशल

जागतिक कर्करोग दिन; कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेले सेलिब्रेटी

डेस्क desk team

आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. जगभरात सगळ्यात जास्त प्रमाणात होणारा आणि ज्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक असणारा हा रोगआहे. तेंव्हा या गंभीर आजारावर मात करण्यासाठी, जनजागृती आणि प्रचार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (who) आणि आंतराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) यांच्या मार्फत प्रोत्साहन आणि या आजारा विरुद्ध लढा देण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.  जागतिक कॅन्सर दिना निमित्त आपण या आजारावर यशस्वीरित्या मात केलेले सेलिब्रेटीं बद्दल जाणून घेऊयात.

युवराज सिंग

भारताचा एक अष्टपैलु क्रिकेटपटु युवराज सिंग याला 2011 सालच्या विश्वचषकानंतर फुफुस्सांचा कॅन्सर झाल्याच वृत्त समोर आल. 2011 साली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर युवराज आजारी पडला. अमेरिकेत वर्षभर उपचार करुन युवराज भारतात परतला. त्यानंतर त्याने भारतीय संघात यशस्वी पुनरागमन केल. ‘क्रिकेटने मला आयुष्यात खुप काही दिले. कधी हार मानायची नाही, ही शिकवण मला क्रिकेटनेच दिली. त्यामुळेच मी कर्करोगाशी लढून पुन्हा मैदानात उतरलो. अशी प्रतिक्रिया त्याने निवृत्ती जाहिर केली तेंव्हा दिली. कॅन्सर पिडित रुग्णांसाठी युवराजचा प्रवास प्ररणादायी आहे.

yuvraj sing after cancer

युवराज सिंग कॅन्सर नंतरचा फोटो

अभिनेत्री मनिषा कोईराला

एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या मनिषा कोईराला हिला 2012 साली वयाच्या 42 व्या वर्षी अंडाशयाचा कॅन्सर झाला. योग्य उपचार, मनाची इच्छाशक्ती, समाज आणि घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला या आजारातून यशस्वीरित्या बरा करु शकतो. असे एका कार्यक्रमा दरम्यान मनिषा कोईराला यांनी सांगितले. तीन वर्षांच्या यशस्वी केमोथेरपी आणि शस्त्रक्रियेने त्यांनी कॅन्सरवर मात केली.

Manisha Koirala after cancer

मनिषा कोईराला कॅन्सर झाल्या नंतरचा फोटो

सोनाली बेंद्रे

बॉलिवुडची मराठमोळी अभिनेत्री जिच्या सहज अभिनयाने आणि नृत्याने अनेकांना एकेकाळी भुरळ घातली अशा सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला. मात्र खचुन न जाता वारंवार सोशल मीडियाच्या माध्यातून ती चाहत्यांच्या संपर्कात रहिली. कॅन्सरवर मात करताना उपचारा दरम्यान सगळे केस जाणे यांसारखे फोटो ही तिने सोशल मीडियावर न्य़ू लुक म्हणून शेअर केले. सोनाली नुकतीच न्यूयॉर्कमधुन यशस्वी उपचार घेऊन भारतात परतली आहे.

sonali bendre after cancer

अभिेनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर नंतरचा फोटो

राकेश रोशन

अभिनेता ह्रतिक रोशन यांचे वडिल अभिनेते दिग्दर्शक राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती ह्रतिकने एका इंस्टाग्राम पोस्टवरुन दिली. यावेळी शस्त्रक्रियेच्या आधिचा एक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये शस्त्रक्रियेच्या दिवशी देखील ते जीम करत आहेत. भरपुर व्यायाम करा असे कॅपशन ह्रतिकने दिले आहे.

इरफान खान

अभिनेता इरफान खानने 2018 साली त्याला कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली. तो सध्या लंडनमध्ये उपचार घेत असून, स्वत: विषयीच्या अपडेट तो चाहत्यांना वारंवार देत असतो.

मुमताज

आपल्या सदा बहार अभिनयाने ब्लॅकेन व्हाईटच्या 1960 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या त्या वेळच्या एक यशस्वी अभिनेत्री मुमताज यांना वयाच्या 54 व्या वर्षी स्तनांचा कॅन्सर झाला होता. मात्र यशस्वीरित्या कॅन्सरवर त्यांनी मात केली आहे. कॅन्सर नंतर आजही त्या सामान्य जिवन जगत आहेत.

या सेलिब्रेटींचा कॅन्सरमुळे मृत्यू

राजेश खन्ना :

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या राजेश खन्ना यांना 2011 साली कॅन्सर झाला. आनंद चित्रपटातुन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या अभिनेत्यांना जगाचा कॅन्सरशी लढता लढता वयाच्या 69 व्या वर्षी निरोप घेतला.

विनोद खन्ना :

आपल्या खास अभिनय शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले. 2017 साली त्यांनी कॅन्सरशी लढा देता देता जगाचा निरोप घेतला.

नर्गिस :

बॉलिवुडची सुंदर अभिनेत्री आणि अभिनेता संजय दत्त याची आई नर्गिस यांचा कॅन्सरने बळी घेतला. संजय दत्त याची बॉलिवुड कारकिर्द सुरु होण्या आधीच कॅन्सरचे निदान झाल्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करुन भारतात परतल्या आणि त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला.

आदेश श्रीवास्तव :

बागबान, बाबुल, कभी खुशी कभी गम या चित्रपटांना संगीत देणारे आदेश श्रीवास्तव यांना कॅन्सरचे निदान झाल्यावर अवघ्या 40 दिवसांत त्यांचा मृत्यू झाला.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: