दरवर्षी मुंबईकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो, त्या काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला (KGAF) सुरुवात झाली आहे. भन्नाट कलाकृतीने भरलेल्या या महोत्सवाला यंदाही भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे तुम्ही अजूनही या मोहोत्सवाला भेट दिली नसेल तर लवकरच भेट द्या.
1999 साला पासून सुरवात झालेल्या या काळा घोडा आर्ट महोत्सवाला यंदा 21 वे वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जवळपास 21 वर्षापासून संगीत, नाट्य, कला अशा विविध क्षेत्रातील कला पाहण्याचा योग आला. या महोत्सवात देश-विदेशातील कलाकरांकडून कला सादर केली जाते. हस्तकला मोठ्या प्रमाणावर दिसण्यात येते. त्याचबरोबर लोकनृत्य आणि विविध शास्त्रीय नृत्यकला हे या मोहोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. तर आता पाहुयात यंदा कोणकोणत्या कलाकृती या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.
लोकनृत्य
या मोहोत्सवामध्ये दरवर्षी लोकनृत्याचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे या लोकनृत्याला पाहण्याची गर्दी कलाप्रेमी करत असतात. दरम्यान यंदा लोकनृत्यामध्ये तान्य सक्सेना यांचे विविध भावना आणि रस प्रदर्शित करणारे भरतनाट्यम सादरीकरण केले जाणार आहे.
स्टँड अप कॉमेडी
महोत्सवामध्ये हास्यकल्लोळ माजविण्यासाठी अबीश मॅथ्यू, कनीझ सुरकास, गुरसिमरन खंबा अशी कॉमेडी विश्वातील दिग्गज मंडळींची हास्य जत्रा अनुभवाला मिळणार आहे.
संगीत
संगीत विभागात जेरी पिंटो, नीना गोपाल असे अनेक कलाकार असमानतेची वागणूक ईशान्येतील कविता, स्थापत्य कलेतील अवकाश व त्याचा प्रभाव अशा विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्याच बरोबर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दी निमित्त खास कवितांच्या आवृत्ती, आणि उषा उत्तप यांचे आत्मचरित्र यासह अनेक पुस्तक प्रकाशन सोहळे पार पडणार आहेत.
दुश्य कला
- भावना सोनावणे– मोडी लिपीतल्या कविता– या कलाकृतीमधून पुरातन भाषा आणि झाडे यांसारख्या मूल्यांचा ऱ्हास दर्शवला गेला आहे.
- रुपाली मदन– भोवरा आणि त्याचा दोरा यांच्या दृश्य प्रतिमेतून मनुष्य आणि परमेश्वर यांच्यातील नैसर्गिक नाते दाखविण्यात आले असून आजच्या भौतिकतावादी जगामध्ये निरागसतेला पुन्हा एकदा स्थान मिळवून देणे अशा इतर कल्पनाही मांडल्या गेल्या आहेत.
वर्कशॉप
उत्कर्ष पटेल आणि अरुंधती दास गुप्ता मुंबईला घडविणाऱ्या मिथक आणि कहान्या आपल्यासमोर सादर करणार आहेत.
या महोत्सवाला 1 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून कलाप्रेमीच्या मादियाळी रोज जमाताना दिसत आहे. येत्या 9 फेब्रवारी पर्यत हा मोहोत्सव सुरु राहणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला भेट द्यायला विसरू नका.