फेसबुक हे समाजमाध्यमांवरील प्रभावी व्यासपीठ आहे.या माध्यमाद्वारे आपल्या दूरच्या मित्र-मैत्रिणीशी संपर्कात राहत येते. अगदी कमी कालावधी हे माध्यम लोकप्रियतेत आले. आता जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. मार्क झुकेरबर्गने स्थापन केलेल्या फेसबुकला आज 16 वर्ष पूर्ण झाली आहेत.
अशी झाली स्थापना :
- हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली.
- फेब्रुवारी 4, 2004 रोजी जकरबर्गने आपल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात खोलीतून फेसबुक लाँच केले.
- महाविद्यालयीन खोलीत आणि हार्वर्डमधील विद्यार्थी एडुआर्डो सेव्हरिन, अँड्र्यू मॅककुलम, डस्टिन मॉस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युजेस यांनी त्यांची मदत केली.
- त्यानंतर गटाने इतर कॉलेज कॅम्पसमध्ये फेसबुकची ओळख दिली. 2012 पर्यंत फेसबुकने एक अब्ज लोक पोहोचले होते.
फेसबुकविषयीच्या आश्चर्यकारक गोष्टी :
- फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग केवळ निळाच रंग व्यवस्थितरित्या पाहू शकतात. त्यांना कलर ब्लाइंडनेस आहे, म्हणून फेसबुकचा रंग निळा आहे.
- फेसबुककडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 5 सेंकदाला 5 नवीन लोक फेसबुक अकाउंट बनवतात.
- फेसबुकचे जगभरात कितीतरी अब्ज युजर्स आहेत. मात्र चीन आणि उत्तर कोरियामध्ये फेसबूकवर बंदी आहे.
- फेसबुकवर वापरकर्ते नावडत्या व्यक्तीला ब्लॉक करू शकतात. मात्र मार्क झुकेरबर्ग यांना कुणीही ब्लॉक करू शकत नाही.
- जर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट आहे व त्याचा मृत्यू झाला असेल. तर याबाबत फेसबुकला सुचना देण्यात येते.