Ads
ओपन मांईड

यंदा फेब्रुवारीत 28 नव्हे 29 दिवस का?

डेस्क desk team

नवीन वर्ष 2020 सुरू होऊन आज महिना लोटला आहे. यंदाच्या वर्षात 365 नव्हे 366 दिवस असणार आहे कारण हे लीप वर्ष आहे. चला तर आज लीप वर्ष’ म्हणजे का? ते का आणि कधी येते? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात…

‘लीप वर्ष म्हणजे? :

ज्या वर्षात एक दिवस अतिरिक्त असतो म्हणजे 365 नव्हे 366 दिवस असतात त्याला ‘लीप वर्ष’
म्हणतात. ते दर 4 वर्षांनी एकदा येते. ‘लीप वर्ष’ असल्यावर सामान्यपणे 28 दिवस असणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस येतात.

असे का होते? :

पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यास 365 दिवस आणि 6 तास लागतात.6 तासांचा हा अतिरिक्त वेळ नोंदविला जात नाही. यामुळे दर चार वर्षांनी तो एका दिवसापेक्षा जास्त होतो आणि फेब्रुवारी महिन्यात अतिरिक्त दिवस जोडला जातो.

असे शोधा लीप वर्ष : लीप वर्ष होण्यासाठी खालील दोन अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • प्रथम म्हणजे विशिष्ट वर्ष चार संख्येने विभागले जाऊ शकते.
    उदा.:2020 हे 4 ने विभागले जाऊ शकते.
  •  जर वर्ष 100 च्या संख्येने विभाज्य असेल तर ते लीप वर्ष नाही तर त्याच वर्षाला 400 च्या संख्येने पूर्णपणे विभागले गेले ते लीप वर्ष असते.
    उदा. 2020 चे विभाजन 100 द्वारे केले जाऊ शकते परंतु ते 400 ने पूर्णपणे विभाजित केले आहे.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: