Ads
बातम्या

कोणत्या कंपनीचा नेट प्लान चांगला ? जाणून घ्या

data plan
डेस्क desk team

एअरटेल आणि वोडाफोन या दूरसंचार कंपनी आपल्या ग्राहकांसाठी त्यांना परवडणारे आणि एकाच प्लानमध्ये अनेक सुविधा देणारे प्लान आणत असते. काहीवेळा प्लानच्या किंमती एकसारख्या असतात मात्र, त्यामध्ये थोडाफार वेगळेपणा असतो. तर एअरटेल आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्या 749 रूपयांचा पोस्ट पेड प्लान देतात. तर आज आपण या प्लानमधील कोणता प्लान चांगाला हे पाहणार आहोत.

749 रूपयांचा एअरटेलचा प्लान

 • या प्लानमध्ये ग्राहकांना 120 जीबी डेटा आहे, तो 200 जीबीपर्यंत रोलओव्हर सुविधेसह मिळतो.
 • अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस अशा सुविधा.
 • अॅमेझॉन प्राइम, Zee5 आणि एअरटेल एक्स्ट्रिम अॅपचा अॅक्सेस आहे.
 • मोबाइल संरक्षणही मिळणार शिवाय 2 अॅड ऑन कनेक्शनही मिळणार.

749 रूपयांचा वोडाफोन प्लान

 • या प्लानमध्येही 120 जीबी डेटा मिळतो, तो 200 जीबीपर्यंत रोलओव्हरच्या सुविधेसह येतो.
 • यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मिळतात.
 • शिवाय वोडाफोन प्ले, अॅमेझॉन प्राइम, ZEE5 सारख्या अॅपचे सबस्क्रीप्शन मिळते.
 • यासोबत 3 हजार रुपयांचे मोबाइल इन्शुरन्सही मिळते.

कोणता चांगला प्लान?

 • दोन्ही कंपन्या 2 अ‍ॅड-ऑन कनेक्शनची ऑफर देतात.
 • एक अ‍ॅड-ऑन कनेक्शन सामान्य आहे तर इतर केवळ डेटा अ‍ॅड-ऑनसह येते. म्हणजेच, इतर कनेक्शनमध्ये आपण केवळ डेटाचा फायदा घेऊ शकता.
 • त्याचवेळी, वोडाफोन सर्व अ‍ॅड-ऑन कनेक्शनची ऑफर देखील देते. पण वोडाफोनच्या योजनेतही एक अट आहे. अ‍ॅड-ऑन कनेक्शनसाठी 30 जीबी डेटाची मर्यादा आहे, तर एअरटेल अशी मर्यादा नाही.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: