कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि त्याबाबतची जागरूकता यासाठी जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कॅन्सर या आजाराचे जवळपास 100 हुन अधिक प्रकार आहेत. शरीराच्या ज्या भागाला, ज्या अवयवाला किंवा ज्या पेशीला हा रोग होतो त्याचेच नाव कर्करोगाला दिले जाते. लहानांपासून ते मोठ्यां पर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना (who) आणि आंतराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) यांच्या मार्फत कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, प्रात्साहन आणि या आजारा विरुद्ध लढा देण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्यामुळे कॅन्सर या आजाराने अनेकांच्या हसत्या खेळत्या आयुष्याला लगाम घातलाय. म्हणून आजच्या दिवशी या रोगाचा समूळ नायनाट होण्यासाठी प्रतिज्ञा करूयात.
भारतातील परिस्थिती
ज्याप्रमाणे साप चावला या भीतीनेच माणूस अर्धमेला होतो, किंवा बऱ्याचदा माणसाचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे कॅन्सर झाला हे कळल्यावर माणूस अर्ध मेला व्हायचा. मात्र वेळीच निदान केल, व्यवस्थित औषधोपचार योग्य रुग्णालयात घेतला, तर कॅन्सर सारखा आजार बरा होऊ शकतो. भारतात दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 2.2 दशलक्ष इतकी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या दोन दशकांत 21.7 जशलक्ष लोकांना कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे. तोंडाच्या कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर निदान उशीरा झाल्यामुळे गर्भपीशवीच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक आहे.
कॅन्सरचे प्रकार
तंबाखु : कोणत्याही चित्रपट गृहात तुम्ही चित्रपट पाहायला गेल्यावर तंबाखु मुळे होणाऱ्या कॅन्सर पेशंटचे व्हिडिओ पाहिलेच असतील. ३३ टक्के लोकांना चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने कॅन्सर होतात. तंबाखू ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो, तेवढी फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. तंबाखुमुळे फुफुस्स आणि तोंडाचा कॅन्सर होतो.
फुफुस्सांचा कॅन्सर :
दिवसाला कमीत कमी दहा सिग्रेट ओढणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होतो. मात्र सिग्रेट ओढल्याने फुफुस्सांचा कॅन्सर होईलच असे सांगता येत नाही. अनेकदा एकदा ही सिग्रेट न ओढणाऱ्यांना देखील फुफुस्सांचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. मात्र सिग्रेट न ओढणाऱ्यांच्या तुलनेत सिग्रेट ओढणाऱ्यांना कॅन्सर होण्याची दहा पट अधिक शक्यता असते.
धुम्रपान करणाऱ्यांना हा कॅन्सर
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठार, यकृत, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान करणाऱ्या या व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होतो.
महिलांना होणारे
महिलांमध्ये प्रामुख्ये स्तनांचा कॅन्सर, रक्ताच्या गाठी, ब्लड कॅन्सर, गर्भ पिशवीचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक आहे.
लहान मुलांना
लहान मुलांना हाडांचा, डोळ्यांचा तसेच गाठी होणे अशा प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. बऱ्याचदा अऩुवंषिक कारणांमुळे देखील कॅन्सर होण्याची शक्यता असते.
उपचार पद्धती
कॅन्सरचे अनेक प्रकार असल्यामुळे प्रत्येक आजारावर उपचाराच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहे. कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. या उपचार पद्धतीला घाबरुन, पैसा किंवा इतर कारणांमुळे देखील अनेंकाचा मृत्यू होतो. मात्र कॅन्सरच्या इलाजावर दिवसेंदिवस येत असलेल्या गोळ्या औषध, जनजागृती यामुळे वेळीच पहिल्याच स्टेपमध्ये निदान झाल्यास 53 टक्के कॅन्सर बरा होऊ शकतो. 63 टक्के कॅन्सरमध्ये रुग्ण पहिल्यासारखे जिवन जगु शकतो.
उपाय ?
कॅन्सर तसा कोणालाही होऊ शकतो. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर तो टाळता येऊ शकतो इतकच. योग्य आहार, योग्य वेळी व्यायाम, धुम्रपान, तंबाखु, सिंगरेट एकंदरीतच सर्वच प्रकारची व्यसन, काही प्रकारचे लसी करण या गोष्टी तुम्हाला कर्करोगापासू दुर ठेवतात.