कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती जाहीर करण्यात आले आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीत असिस्टंट कंपनी सेक्रेटरी-II साठी 1 जागा, असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) साठी 1 जागा, असिस्टंट मॅनेजर (लीगल) साठी 1 जागा, असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) साठी 1 जागा, मॅनेजमेंट ट्रेनी (HR) साठी 1 जागा, मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) साठी 10 जागा, मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स)साठी 10 जागा, ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिवसाठी 20 जागा, ज्युनिअर असिस्टंट (जनरल) साठी 14 जागा, ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट्स) साठी 15 जागा आणि हिंदी ट्रांसलेटर साठी 1 जागा अशा एकूण 75 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) कंपनी सचिवसह विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) 50% गुणांसह BE (सिव्हिल) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: 50% गुणांसह MBA/ PGDM
- पद क्र.6:MBA (अॅग्री बिझिनेस मॅनेजमेन्ट/ एग्रीकल्चर)
- पद क्र.7: CA/ CMA/ MBA (Fin)/ MMS/ M.Com.
- पद क्र.8: 50% गुणांसह B.Sc (एग्रीकल्चर) [SC/ ST/ PH: 45% गुण]
- पद क्र.9: 50% गुणांसह B.Sc (एग्रीकल्चर) [SC/ ST/ PH: 45% गुण]
- पद क्र.10: 50% गुणांसह B.Com [SC/ ST/ PH: 45% गुण]
- पद क्र.11: इंग्रजी विषयासह हिंदी पदवी
वयोमर्यादा
- पद क्र.1 ते 4: 18 ते 32 वर्षे
- पद क्र.5 ते 11: 18 ते 30 वर्षे
- SC/ST साठी 5 वर्षांची आणि OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क
दरम्यान, या भरतीसाठी खुल्या वर्गातील उमेदवाऱ्यांना एक हजार रूपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा