महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण करून पाकिस्तान, बांगलादेशातील घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी 9 फेब्रुवारी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, मोर्चाच्या प्रस्ताविक मार्गाला नकार देत पोलीसांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे.
मनसेकडून भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चासाठी मार्ग ठरविला होता. मात्र, या मार्गाला नकार देत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गावरून मोर्चा नेण्याची परवानगी दिली आहे. भायखळा ते आझाद मैदान मार्गावर मुस्लीम वस्ती अधिक असल्याने मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांनी मनसेला हा पर्यायी मार्ग सुचवला असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
भारत माझा देश आहे! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/aUst3XCEJz
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 3, 2020
दरम्यान, पोलीसांनी दिलेल्या सूचना मनसेने मान्य केला असून 9 फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरून मोर्चा निघणार असे पोस्टरही पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
मनसेचा सीएए आणि एनआरसीला पाठिंबा असल्याच्या चर्चा मनसेच्या अधिवेशनानंतर सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले की, बेकायदेशीररित्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हकला असे म्हंटले असल्याचा खुलासा केला. सीएएला समर्थन दिले नाही तर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.