सध्याचे जीवनमान हे अत्यंत धावपळीचे झाले आहे. दररोज नवनवे व्हायरस आणि आजार डोक वर काढत आहेत. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थसंकल्पात महिलांचे लग्नासाठीचे तसेच आई होण्यासाठीचे एक विशिष्ट वयोमर्यादा संबंधी कायदा करण्यास सरकार विचाराधीन असल्याचे सांगितले. दरम्यान, देशातील 70 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ही काही जिल्ह्ये आहेत जिथे आजही मुलींचे बाल विवाह होतात. त्यामुळे कमी वयात गरोदर पणा, आणि अनेक आजारांना महिलांना बळी पडावे लागते. तेंव्हा महिलांनी वयाच्या 30 नंतर या टेस्ट जरुर कराव्या.
पॅप स्मिअर चाचणी
साधारण लग्न झालेल्या महिलांनी वयाच्या 30 नंतर पॅप स्मिअर ही चाचणी जरुर करावी. अनेक महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होतो. त्यामुळे तीन वर्षांतून एकदातरी ही चाचणी महिलांनी करावी. यात गर्भाशय सुस्थितीत आहे की नाही ते कळते. जगभरात गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण 6 ते 7 टक्क्यांना वाढले असून, 2012 साली भारतात 1 लाख 90 हजार महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे ही टेस्ट करणे काळाची गरज बनली आहे.
स्तनांच्या कॅन्सरसाठी तपासणी
स्तनांच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण देखील महिलांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. स्तनांमध्ये गाठ होणे हे या कॅन्सरचे एक लक्षण आहे. तेंव्हा मॅमोग्राफी स्क्रनिंग अशा प्रकारच्या कॅन्सरची चाचपणी आणि त्याला आळा घालते. 30 ते 45 वयाच्या महिलांनी ही चाचणी वर्षातून एकदा तरी करावी.
थॉयरॉइड टेस्ट
महिलांमध्ये थॉयरॉइड होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वयानुसार शरीरात, हर्मोनसमध्ये होणाऱ्या बदलामुळे थॉयरॉइड होतो. अचानक कारण नसताना वजन वाढणे, किंवा कमी होणे. सातत्याने मुड बदलणे, वजन कमी जास्त होणे, मासिक पाळी नियमित न येणे, व्यवस्थित झोप न लागणे ही थॉयरॉइडची लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षण आढळल्यास किंवा 30 वयानंतर दर पाच वर्षांनी थॉयरॉइड टेस्ट करावी.
कॉलेस्टोरॉल तपासणी
साधारण कोणताही आजार हा चाळीशी नंतर अजून ठळकपणे जाणवालया सुरवात होते. कारण या वयात तारुण्यातून माणूस उतार वयाला लागत असतो. त्यामुळे खाण्या पिण्यात बदल करणे गरजेचे असते. तसेच आपल्याला तरुणपणी मुका मार किंवा इतर काही अघात झाला असेल तर त्याचा परिणाम चाळीशी पासून दिसायला लागतो. मात्र कमी वयात लग्न झालेल्या किंवा अधिक श्रम, आणि कमी वयात गरोदरपणा मुळे महिलांमध्ये त्याचा परिणाम वयाची 30 ओलांडल्यावर दिसायला लागतो. प्रत्येक महिलेनी वर्षातून किमान एकदा तरी रक्तदाबाची चाचणी केली पाहिजे.