न्यूझीलंडमध्ये माउंट माउंगनुई येथे रंगलेला पाचवा सामना भारतीय संघाने ७ धावांनी जिकला. या विजयासह भारताने टी-20 मालिका 5-0 अशी जिंकली. या अखेरच्या सामन्यातील विजयानंतर दोन्ही संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. तर एक नजर टाकूयात नव्या विक्रमावर…
- आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंचा 5-0 ने पराभव केला. त्यामुळे भारतीय संघ हा जागतिक क्रिकेटमध्ये टी-20 मालिकेत 5-0 असा पराभव करणारा पहिला संघ ठरला आहे.
- भारतीय संघाने तिसऱ्यांदा परदेशात क्लीन स्वीप केला आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2015-16 मध्ये ऑस्ट्रोलिया आणि 2019 ला वेस्ट इंडिज यांचा त्यांच्याच घराच पराभव केला होता. तर आता न्यूझीलंडचा त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव केलाय.
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. विराटने आतापर्यंत 15 आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळत 10 मालिकेंवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत डु प्लेसिने 9 मालिकेत, इंग्लंडच्या इयान मॉर्गनने यांनी 7 मालिका, डॅरन समीने 6 मालिका तर महेंद्र सिंग धोनीने 5 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
- रविवारी झालेल्या अखेरच्या मालिकेत भारतीय गोलंदाज शिवम दुबे महाग ठरला. त्यांनी एका ओव्हर मध्ये तब्बल 34 धावा दिल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारा हा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2016 मध्ये स्टुअर्ट बिनीने वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात 32 धावा दिल्या होत्या, तर 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारले होते. त्यामुळे त्याच्या नावावर सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे.
- न्यूझीलंड संघाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंड संघाचा 23 व्या टी-20 सामन्यात पराभव झाला. त्यामुळे सर्वाधिक सामने पराभवाचा विक्रम न्यूझीलंड संघाच्या नावे नोंद झाला आहे.