नवीन वर्षाचा दुसरा महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या आठवड्याला हि सुरुवात झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. या आठवड्यात तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया.
मेष
मेष राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीकोनातून फलदायी ठरेल. व्यवसाय तसेच नोकरदारांना हा आठवडा प्रगतीशील आणि आर्थिक लाभ, प्रतिष्ठा आणि नवीन संधी मिळवुन देणारा ठरणार आहे. मेष राशीसाठी या आठवड्यातील ग्रहमान अनुकूल राहिल.
वृषभ
या राशीच्या मंडळींना धार्मिक कार्य, पुजाविधी करण्याचा मानस या आठवड्यात राहील. सामाजिक कार्य करण्यासाठी तुमच्यासाठी हा आठवडा उत्तम ठरणार आहे. आपल्याला कार्यात फल प्राप्ती आणि निरुत्तरीत प्रश्नांची उत्तर या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या मंडळींना सुसंवाद साधण्याची गरज आहे. आपल्या वाणीचा समतोल ढळु न देणे तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. बोलणे कमी करुन, जास्त ऐकल्याने जास्त प्रश्न सुटती. वरिष्ठांशी जुळवून घ्या. वाद विवाद शक्यतो टाळा, नाहीतर नुकसानाची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा अधिक परिश्रमाचा ठरणार आहे. लक्ष देऊन काम करणे या आठवड्यात अत्यंत गरजेचे आहे. एका वेळी एकाच कामावर शक्यतो लक्ष केंद्रीत करा. छोटीशी चुक सुद्धा महागात पडू शकते.
सिंह
गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत असलेल्या गोष्टींना या आठवड्यात यश मिळणार आहे किंवा यशाचा मार्ग तुम्हाला सापडणार आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्यांच्या सोबत राहा. सहकाऱ्यांचा आणि चांगल्या संगतीचा लाभ होईल.
कन्या
वैवाहिक जोडप्यांसाठी हा आठवडा चांगला ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहणार असून, सहल किंवा कामासाठी बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी तसेच मोठ्या हुद्द्यावरील मंडळींना परदेशी जाण्याची संधी चालून येईल.
तुळ
व्यावसायिकांसाठी या आठवड्यातील स्थिती सामान्य राहिल. कामाचा व्याप वाढून महत्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास कामे सुलभ होतील.
वृश्चिक
कला क्षेत्रातील आणि व्यावसायीक मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिशील ठरणार आहे. कोणत्याही कामात मानसिक, बौद्धीक आणि आरोग्याची चांगली साथ असल्याने कामात उत्साह राहिल.
धनु
धनु राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा काहीसा खर्चीक राहण्याची शक्यता आहे. तेंव्हा अनावश्यक खर्चावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवा. तसेच वाहन चालवणाऱ्या मंडळींनी थोडीशी आधिक काळजी घेण्याची गरज आहे.
मकर
शनीचा वास असला तरी मकर राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. धार्मिक गोष्टी करण्यात या आठवड्यात तुम्हाला अधिक रस असल्याचे जाणवेल. कोणत्याही गोष्टीचा अतिक शक्यतो टाळा.
कुंभ
या राशीच्या मंडळींना हा आठवडा सर्वसामान्य राहील. फार मोठ्य़ा कोणत्याही गोष्टींत बदल होणार नाही, बदलत्या हवामानामुळे प्रकृतीच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील. या व्यतीरिक्त इतर राशीच्या मंडळींशी जुळवून घेताना शाब्दीक वाद टाळा.
मीन
मीन राशीच्या मंडळींसाठी ग्रहमान अतिशय अनुकूल असणार आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळींना ग्रहमान अतिशय उत्तम आहे. कोणतेही आर्थिक मोठे व्यवहार करत असल्यास हरकत नाही, मात्र योग्य सल्ला अवश्य घ्या.