पहिल्यांदाच ‘पोको’ ही नवी स्मार्टफोन कंपनी भारतात आपला पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. या कंपनीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘Poco X2’ हा 4 फेब्रुवारीपर्यंत लाँच होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ‘Poco X2’ हा फोन ‘Redmi k30 4G’चा नवा व्हर्जन असल्याचे म्हंटले जात आहे.
फ्लिपकार्ट कंपनीने या स्मार्टफोनकरिता एक स्वतंत्र वेबसाईट लाँच केली आहे. त्यामुळे ‘Poco X2’ च्या ई-रीटेलर्सपैकी फ्लिपकार्ट एक असल्याचे यावरून स्पष्ट होते.
An Xperience that will make you go, “Bruh, it’s #SmoothAF“. #POCOX2 is arriving on Feb 4th 2020.
Want to know if your smartphone is Smooth AF? Visit now: https://t.co/LQqSvTpgLz pic.twitter.com/BB5RFQ8lVO
— POCO India (@IndiaPOCO) January 27, 2020
तसेच शाओमी कंपनीपासून वेगळे झाल्यावर ‘Poco X2’ हा पोको कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन असला तरी यानंतर पोको कंपनी येणाऱ्या काळात ‘फ्लैगशिप Poco F2’ हा देखील एक नवा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या किंमती बद्दल अधिकृत अशी माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण 18 हजार 999 ही संभाव किंमत असल्याचे बोलल जात आहे.