रविवार म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांची चटक लागते. तसेच सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्याने गरमागरम चमचमीत पदार्थ खावे असे सगळ्यानाच वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत खमंग अशी तूरडाळीची भजी कशी बनवायची हे सांगणार आहोत.
साहित्य
2 वाट्या तूरडाळ, 2 ते 3 बारीक चिरून कांदे, आले, 2 ते 3 ओल्या मिरच्या, 1 उकडलेला बटाटा, 7 ते 8 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथींबीर, चवीनुसार मीठ आणि
तळण्यासाठी तेल
कृती
- सर्वप्रथम तूरडाळ 4 ते 5 तास भिजत ठेवून नंतर ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी.
- त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले, लसूण, मिरची यांची पेस्ट तसेच उकडलेला बटाटा कुस्करून घालावा.
- चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे.
- तेल गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे त्यात सोडून मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत.
- अशी गरमागरम भजी नुसती सुद्धा खायला चांगली लागतात.
- पण कोणाला हवे असेल तर सोबत चटणी किंवा सोस द्यायलाही हरकत नाही.