दर रविवारी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या देखभाल-दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक जाहीर केला जातो. उद्या रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या भायखळा ते विद्याविहार स्थानका दरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 10.42 ते दुपारी 3.44 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉक दरम्यान भायखळा स्थानकातून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल भायकळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील.
- सदर लोकलना दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबा असेल. मात्र, विद्याविहारपासून त्या लोकल धिम्या मार्गावर धावतील.
- तसेच जाहीर केलेल्या ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करी रोड येथे लोकलचा थांबा नसेल.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- या मार्गावरिल सीएसएमटीहून वाशी/ बेलापूर/ पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रविवारी सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 पर्यंत रद्द करण्यात आलेय.
- तर सकाळी 10.21 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पनवेल/ वाशी/ बेलापूर हून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाहीत.
- तसेच सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल धावतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉकमुळे बोरीवली ते विरारदरम्यान धिम्या लोकल जदल मार्गावर धावतील.
- तर ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहे.