Ads
बातमीदार स्पेशल

आजवर भारतात किती जणांना फाशी देण्यात आली?

suside
वसईत तरुणाची आत्महत्या
डेस्क desk team

भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 70 वर्षात केवळ 57 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वतंत्र भारतात पहिली फाशी नथुराम गोडसेला देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी किमान 130 आरोपींना फाशीची शिक्षा सुनवीण्यात येते परंतु अमंलबजावणी शून्य टक्क्यात आहे. या मागचे मुख्य कारण आहे माफी करिता चालणारी लांब प्रक्रिया त्यामुळे फाशीची शिक्षा देण्यात उशीर होतो.

 राज्यानुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली प्रकरणे :

  • उत्तर प्रदेश – 318
  • महाराष्ट्र – 108
  •  कर्नाटक – 107
  • बिहार – 105
  • मध्यप्रदेश – 104 (हे सर्व प्रकरणे मागील दहा वर्षातील आहे.)
  1. धनंजय चॅटर्जी : धनंजय चॅटर्जी याचा पहिला नंबर आहे. हेतल पारिख या 14 वर्षीय मुलीचा बलात्कार आणि खुन असा आरोप चॅटर्जीवर होता. तब्बल 14 वर्ष तुरूगात काढल्यावर कोलकताच्या तुरूंगात त्याला फासावर लटकविले.
  2. मोहमद अजमल अमीर कसाब : या आतंकवाद्याने 26/11 ला संपूर्ण मुंबईत खुनाचा नंगानाच चालविला होता. कसबला 21 नोव्हेंबर 2012 ला येरवाडा पुणे येथे फाशी देण्यात आली.
  3. अफजल गुरु : 13 डिसेंबर 2001 साली झालेला संसदेवरील हल्ल्याचा मास्टर माइंड अफजल गुरु होता. 9 फेब्रुवारी 2013 रोजी दिल्ली येथील तिहार जेलमध्ये अफजल गुरुला फाशी देण्यात आली.
  4. याकुब मेमन : 1993 मध्ये झालेल्या मुंबई येथील 13 बॉम्बब्लास्ट करिता पैसा पुरविणारा आणि मुख्य सूत्रधारापैकी एक याकुब मेमन हा होता. त्याला 30 जुलै 2015 रोजी नागपूर येथे फाशी दिली.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 4 दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देणार असल्याचा निर्णय देण्यात आला असला तरी अद्यापही त्यांची फाशी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वाढली आहे.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: