भारताने सुपरओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. या विजयाने भारताने 4-0 ने मालिका खिशात घातली आहे.या सिरीजमधला सुपरओव्हरमधला भारताचा दुसरा विजय ठरला आहे.
न्युझीलंडने भारतासमोर १४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने १० रन, विराट ६ रन मारून सुपर विजय मिळवला. या विजयाने भारताने 4-0 ने मालिका खिशात घातली
भारताविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. यावेळी मैदानावर उतरलेल्या भारताने १६५ धावांपर्यंत मजल मारली होती. मनिष पांडेने ३६ चेंडूत ३ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ५० धावा केल्या. तर राहुलने 39 धावा, शार्दुल ठाकूर २०, विराट व सैनीने ११ तर इतर फलदाजांनी एक अंकीच धावाचा आकडा गाठला होता.
न्यूझीलंड संघाला 166 धावाचा पाठलाग करायला होता.मात्र न्यूझीलंड संघ 165 धावा करू शकला नाही. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना न्यूझीलंड दोन धावा काढल्या त्यात रनआउट झाले. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यामध्ये मुन्रो 64, सेफर्ट 57, टेलर ने 24 धावा केल्या होत्या.