Ads
समीक्षण

Movie Review :खुर्चीला खेळवून ठेवणारा ‘चोरीचा मामला’!

choricha mamla movie
डेस्क desk team

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक विषयला धरून किंवा प्रेक्षकांना खुर्चीला खेळवणारा आणि पोटभरून हसवणारे चित्रपट हे येतच असतात. त्यात काही असे ही चित्रपट असतात तो बघताना कोणतेही तर्क-वितर्क लावले जात नाही निवळ हस्यकल्लोळ अनुभवायला मिळतो. अशाचा धाटणीचा अभिनेता प्रियदर्शन जाधव लिखित, दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘मस्का’ या चित्रपटानंतर प्रियदर्शिनचा दिग्दर्शक म्हणून ‘चोरीचा मामला’ हा दूसरा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी जबरदस्त स्टारकास्ट लाभली आहे.

चित्रपटाची कथा

‘चोरीचा मामला’ या चित्रपटाच्या गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर, चोरी या संकल्पने भोवती फिरणारी एका रात्रीत घडणारी आणि बिघडणारी गोष्ट आहे. नंदन (जितेंद्र जोशी) हा पेशाने चोर आहे. नंदन चोर असला तरी तो प्रमाणिक चोर आहे, आपल्याला जितकी गरज आहे तिकच तो चोरतो. नंदनची बायको आशा (कीर्ती पेंढारकर) ही देखील थोडीशी सभावाने भोळी आणि प्रमाणिक आहे. नंदन एके रात्री राजकारणी अमरजीत पाटील (हेमंत ढोंगे) याच्या फार्म हाऊसमध्ये कोणी नसताना चोरी करण्यास जातो. मात्र, अमरजीत त्याच्या श्रद्धा (अमृता खानविलकर) नावाच्या मैत्रिणीला घेऊन अचानक फार्म हाऊसमध्ये येतो. श्रद्धा ही पेशानी गायिका असते तिला अमरजीतला मोहात अडकवून पैसे उकळायचे असतात.

चोरी करण्याच्या ध्येयाने आलेला नंदन तर अमरजीत आणि श्रद्धा याच्या धुमाकुळ पाहाणाजोगा आहे. त्यात भर म्हणून अंजली (क्षिती जोग) आणि अभिनंदन (अनिकेत विश्वासराव) यांची ही फार्म हाऊसमध्ये एंट्री होते. आता हे दोघे कोण? त्याच्या येण्याने फार्म हाऊसमधील गुतांगुत कसा वाढतो? नंदन चोरी करण्यात यशस्वी होतो का? अमरजीत आणि श्रद्धाचे नेमके काय होते? अशी प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाली असतीत. याची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाचे यश

चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपली भूमिका उत्तम रित्या साकारली आहे. चित्रपटाच्या कथानकातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेले संवाद आणि मार्मिक मिश्किल विनोद चित्रपटाची उंची अधिक वाढवतात. परिणामी चित्रपट प्रेक्षकांना स्वतःशी बांधून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

चित्रपटाला स्टार
3.5

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: