Ads
बातम्या

अजय देवगण गाजवणार मैदान

डेस्क desk team

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता अजय देवगनने आपला मोर्चा ‘मैदाना’कडे वळवळा आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो मैदानात खेळताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाम ‘मैदान’ असं आहे. चित्रपटाचे काही पोस्टर चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. याआधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटांचे टीझर आणि पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अजय हातात बॉल पकडून उभा होता तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तो बॉल किक करताना दिसत आहे. पोस्टरमध्ये त्याने डेनिम शर्ट आणि ट्राउजर घातलं आहे. खुद्द अजयने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘बदलाव हवा असेल तर फक्त एक व्यक्ती देखील पुरेसा आहे.’ असं लिहिलं आहे. ‘चित्रपटाची कथा भारतीय फुटबॉलच्या सोनेरी दिसवसांची त्याचप्रमाणे सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध कोचची आहे.’ अशा आशयाचं कॅप्शन त्याने दुसऱ्या फोटोला दिलंय.

चित्रपटाच्या बाबतील सांगायच झालं तर, चित्रपटाची कथा १९५६ ते १९६२ सालातील भारतील फुटबॉल टीम आणि त्यांचे कोच यांच्या भोवती फिरताना दिसणार आहे. तेव्हाचा काळ फुटबॉलसाठी सोनेरी दिवसांचा होता. मेलबर्न ऑलिम्पिकमधील अनेक बड्या संघांना हरवून १९५६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला.

त्यानंतर संघाने परत कधीच अशी कामगिरी केली नाही. त्यावेळी भारतीय टीमचे कोच सय्यद अब्दुल रहीम होते. कर्करोगाशी दोनहात करत त्यांनी १९६२ मध्ये आशियाई स्पर्धेत संघाला सुवर्णपदक दिले. ‘मैदान’या चित्रपटामध्ये अजय कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेला न्याय देणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: