महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्रिपुराचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे महाराष्ट्राच्या खात्यात 6 गुण जमा झाले आहेत.
सामन्यातील घडामोडी :
- महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतला निर्णय
- प्रथम फलंदाजीस उतरलेल्या त्रिपुराचा पहिला डाव 121 धावांत आटोपला
- महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 208 धावा; त्रिपुरावर 87 धावांची आघाडी घेतली होती.
- त्रिपुराच्या दुस-या डावात सर्वबाद 290 धावा; महाराष्ट्रासमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य
- दुसऱ्या डावांत महाराष्ट्राकडून 55.5 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 205 धावा करत लक्ष गाठले.
दरम्यान, अंकित बावणे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.