मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील पहिली एसी लोकचे लोकार्पण आज करण्यात आले आहे. ही एसी लोकल ठाणे ते वाशी-पनवेल अशी धावणार आहे. तर पहिल्या फेरीची धुरा महिला मोटर वूमन मनिषा म्हस्के यांच्याकडे देण्यात आली होती.
दरम्यान, 31 जानेवारीपासून ट्रान्स हार्बर मार्गावर या एसी लोकलच्या दिवसातून अप-डाऊन मार्गावर 8-8 अशा एकूण 16 फेऱ्या नियमित होणार आहेत.
All set for inaugural run flag off of Central Railway’s first AC Suburban train from Panvel to Thane through video link by Hon’ble MoSR Shri @SureshAngadi_ ji from CSMT. pic.twitter.com/sm4QkiW5Mg
— Central Railway (@Central_Railway) January 30, 2020
एक नजर एसी लोकलच्या वेळापत्रकावर
- पनवेल-ठाणे- सकाळी 5.44 वाजता निघणार तर सकाळी 6.36 वाजता पोहचणार
- ठाणे-नेरुळ- सकाळी 6.64 वाजता निघणार तर सकाळी 7.16 वाजता पोहचणार
- नेरुळ-ठाणे- सकाळी 7.29 वाजता निघणार तर सकाळी 8 वाजता पोहचणार
- ठाणे-वाशी- सकाळी 8.08 वाजता निघणार तर सकाळी 8.37 वाजता पोहचणार
- वाशी-ठाणे- सकाळी 8.45 वाजता निघणार तर सकाळी 9.14 वाजता पोहचणार
- ठाणे-नेरुळ- सकाळी 9.19 वाजता निघणार तर सकाळी 9.49 वाजता पोहचणार
- नेरुळ-ठाणे- सकाळी 9.57 वाजता निघणार तर सकाळी 10.27 वाजता पोहचणार
- ठाणे-बेलापुर- सकाळी 10.40 वाजता निघणार तर सकाळी 11.19 वाजता पोहचणार
- पनवेल-ठाणे- दुपारी 4.14 वाजता निघणार तर संध्याकाळी 5.08 वाजता पोहचणार
- ठाणे-नेरुळ- संध्याकाळी 5.16 वाजता निघणार तर संध्याकाळी 5.46 वाजता पोहचणार
- नेरुळ-ठाणे- संध्याकाळी 5.54 वाजता निघणार तर संध्याकाळी 6.24 वाजता पोहचणार
- ठाणे-नेरुळ- संध्याकाळी 6.29 वाजता निघणार तर संध्याकाळी 6.59 वाजता पोहचणार
- नेरुळ-ठाणे- संध्याकाळी 7.08 वाजता निघणार तर संध्याकाळी 7.38 वाजता पोहचणार
- ठाणे-पनवेल- संध्याकाळी 7.49 वाजता निघणार तर रात्री 8.41 वाजता पोहचणार
- पनवेल-ठाणे- रात्री 8.52 वाजता निघणार तर रात्री 9.46 वाजता पोहचणार
- ठाणे-पनवेल- रात्री 9.54 वाजता निघणार तर रात्री 10.46 वाजता पोहचणार