न्यूझीलंड दौऱ्यातील पाच सामन्यांची टी-20 सामना भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यातच आपल्या नावे केला. भारतीय संघाने पहिली फलंदाजी करून न्यूझीलंड समोर 180 धावाचे आवाहन ठेवले होते. न्यूझीलंडने चांगलाच धावांचा पाठलाग केला. मात्र, सामनामध्ये धावांची बरोबरी झाल्याने विजयसाठी सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात भारतीय संघाच सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा यांनी धडाकेबाज फलंदाजी करून न्यूझीलंडचा तोंडचा धास हिसकावून पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये टि-20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला.
या शब्दात केले कौतुक
दरम्यान, या विजयचा आनंद जगभर व्यक्त होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही भारतीय संघाने मिळवलेल्या विजयचे आणि रोहित शर्माने सुपर ओव्हरमधील शेवटच्या षटकारांचा उल्लेख करत कौतुकाचा वर्षावर केलाय. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा आनंद व्यक्त केलाय.
T3425 – INDIA INDIAINDIA .. what a victory in the super over .. T20 3rd game vs NZ .. win series .. first time in NZ .. CONGRATULATIONS .. 10 runs needed in 2 balls .. and Rohit hits 2 sixes ..UNBELIEVABLE🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 29, 2020
सध्या अमिताभ बच्चन यांनी ‘अविश्वसनीय’ असे म्हणत केलेले ट्विट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. काही क्षणातच शेकडो नेटकांनी या ट्विटला प्रतिक्रिया दिल्या आहे.