सध्या सगळ्याचे लक्ष 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थ संकल्पाकडे आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. प्रत्येक अस्थापन म्हणजेच देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायतही आपला बजेटमध्ये शासनाच्या पुढील वर्षांच्या उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडाला जातो. सरकाचे खर्च तीन खात्यांमध्ये विभागले जातात. एक भारतीय सामाजिक खाते, दोन आपत्कालीन निधी खाते आणि तिसरे सार्वजनिक खाते.
दरम्यान, अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आणतात तेव्हा सगळ्याचे लक्ष त्यांच्या हतात असणाऱ्या लाल सुटकेस कडे असते. अनेकाना प्रश्न पडतो की अर्थसंकल्प लाला सुटकेस मध्येच का आणला जातो? तर आज आम्ही तुम्हाला या लाल सुटकेस मागील कारणची उकल करून देणार आहोत.
जेव्हा अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यास येतात तेव्हा संसदेत केला जाणाऱ्या त्यांच्या भाषणाकडे आणि लाल सुटकेसमधून आणण्याऱ्या अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांकडे देशातील सर्व जनतेचे लक्ष असते. अर्थसंकल्पासाठी लाल सुटकेस महत्वाची आहे. कारण यास 159 वर्षांपासूनची जूनी परंपरा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; सन 1860 मध्ये ब्रिटनच्या चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी लेदर बॅगेतून पहिल्यांदा आर्थिक लेखाजोखा आणला होता. तेव्हापासून या लाल सुटकेसच्या प्रथेला सुरूवात झाला होती. ही खास सूटकेस ब्रिटनच्या राणीने विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांना भेट म्हणून दिली होती. त्यानंतर नकळतपणे लाल सुटकेसचा पायंडा सुरू झाला.
भारतात सर्वप्रथम 26 नोब्हेंबर 1947 रोजी त्तकालीन अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी अभिजात भारत आणि स्वतंत्र भारतासाठी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी षण्मुखम चेट्टी यांनीही लाल सूटकेसमधून अर्थसंकल्प आणला होता. तर त्यानंतर दरवर्षा लाल सुटकेसमध्येच अर्थसंकल्प आणण्याची प्रथा सुरू झाली.