सर्व स्मार्टफोन कंपनी आपल्या ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये नेमक काय पाहिजे हे लक्षात घेऊन नव नवीन स्मार्टफोन्स बाजारात आणत असते. प्रत्येक ग्राहक हा स्मार्टफोनमध्ये कॅमेरा, स्टोरेज आणि विशेष म्हणजे बॅटरीवर जास्त भर देतो. तसेच लवकरात लवकर चार्ज होईल याचाही विचार करतात. मात्र, आता ‘Oppo’ या लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी या सगळ्याचा विचार करून एक दमदार स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोन नाव ‘Oppo Find X2’ असे आहे. लँचिंगपूर्वी कंपनीने या स्मार्टफोनची माहिती शेअर केली आहे. एक नजर त्यावर टाकूया…
- 2K रिझोल्युशन आणि 120Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरचा जगातला पहिला फोन
- ड्युअल मोड 5G
- 48 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता
- J 5x हायब्रिड ऑप्टिकल झूम सुविधा
- सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा
- 65 W सुपर VOOC फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञान
- 4000 mAh क्षमतेची बॅटरी
‘Oppo Find X2’ हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. लँचिंगआधी दिलेल्या माहिती मध्ये किंमतीचा उल्लेख नसल्याने अद्याप अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही.