Ads
ओपन मांईड

जाणून घ्या नवीन 22 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव!

डेस्क desk team

राज्यात नवे 22 जिल्हे व 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे व 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

 या जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव? 

▪ नाशिक : मालेगाव आणि कळवण
▪ ठाणे : मीरा-भाईंदर आणि कल्याण
▪ बुलडाणा : खामगाव
▪ यवतमाळ : पुसद
▪ अमरावती : अचलपूर
▪ भंडारा : साकोली
▪ चंद्रपूर : चिमूर
▪ गडचिरोली : अहेरी
▪ जळगाव : भुसावळ
▪ लातूर : उदगीर
▪ बीड : अंबेजोगाई
▪ नांदेड : किनवट
▪ सातारा : माणदेश
▪ पुणे : शिवनेरी
▪ पालघर : जव्हार
▪ रत्नागिरी : मानगड
▪ रायगड : महाड
▪ अहमदनगर : शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: