गेल्या काही दिवसांपासून विरारमध्ये घरफोडी चोराट्याने धुमाकुळ माजवला होता. मात्र, विरार पोलीसांना घरफोडी करणाऱ्या एका संशयीत गुन्हेगाराला अटक करण्यात अखेर यश आले आहे. या संशयीत गुन्हेगाराकडून पोलीसांनी तब्बल 6 लाख 38 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यात 200 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
चोरट्याकडून इतका मुद्देमाल जप्त
विरार पोलीसांनी 20 जानेवारीला सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर विरारमध्ये झालेल्या पाच घरफोडी प्रकरण उघडकीस आले. पोलीसांनी पाच घरफोडीमध्ये चोरीचा तब्बल 6 लाख 38 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात 50 हजार रूपयांचे 20 ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार, 15 ग्रॅम वजनाचे 35 हजार रूपयाचे नेकलेस, 55 हजार रूपयाचे 2.5 तोळ्याचे मंगळसुत्र, 6 हजार रूपयाचे 3 ग्रॅम वजनाचे कानातील रिंगा, 32 हजार रूपयांचे 12 ग्रॅम वजनाचे नेकलेस, 40 हजार रूपयांचे 18 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, 30 हजार रूपयांचे 11 ग्रॅम वजनाचे नेकलेस या सोनाच्या दागिन्यांचा समावेश आहे.
उपविभागिय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयीत गुन्हेगार हा सराईत चोर असून रात्री नाहीतर दिवसा घरफोडी करणारा हा चोर आहे. दिवसभर बंद घरांची पाहणी करून त्यांनी घरफोडी केल्याचे पोलींसांनी सांगितले आहे. तसेच या संशयीतावर अंधेरी येथील डी.एन.नगर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.