बॉलिवूडचा दबंग, भाईजान म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता सलमान खान सामाजिक कार्य असो वा चित्रपटासंबंधीतल्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता एका वेगळ्याच कारणाने सलमान खान चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक व्हिडिओ.
व्हिडिओत काय?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत सलमान खान विमानतळावरून बाहेर जाताना दिसत आहे. मात्र, त्याला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीतून वाट काढताना तो दिसतोय. या दरम्यान, एक चाहता सलमानचा फोटो काढण्यासाठी पूढे येताच सलमानने रागात त्याचा फोन हिसकावून घेतला व निघून गेला. हा सर्वप्रकार पाहून चाहते ही अचंबित झाल्याचे पाहायला मिळाले.
मागील वर्षाच्या अखेरीस सलमान खानचा ‘दबंग 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला चाहत्यांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना चित्रपट आवडला तर काहींनी चित्रपटाची खिल्ली उडवली. सध्या सलमान आपल्या आगामी ‘राधे’ या अॅक्शनपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचा पहिले पोस्टर काहि दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले आहे.