भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या टी-20 मालिकेत भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर आज या मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टन येथे खेळाला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर न्यूझीलंड भूमीवर हा पहिला मालिका विजय ठरेल. त्याच बरोबर संघाचा कर्णधार विराट कोहली ही यावेळी एका नवा विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.
कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात फक्त 25 धावा काढल्यास माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला मागे टाकू शकतो. टी-20 मालिकांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदांच्या यादी पुढील स्थान मिळवू शकतो. सध्या विराट या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर 1 हजार 112 धावा करून महेंद्र सिंग धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन 1 हजार 148 धावा करत दुसऱ्या तर दक्षिण आफ्रितेचा फाफ डु फ्लेसिस हा 1 हजार 273 धावांसह पहिल्या स्थानी आहे.
#TeamIndia will take on the @BLACKCAPS in the 3rd T20I at the Seddon Park.
Will the men in blue seal the series?
Live action starts at 12.30 PM IST #NZvIND pic.twitter.com/TLkc1yojo2
— BCCI (@BCCI) January 29, 2020
दरम्यान, विराटच्या फक्त 25 धावानी धोनीचा विक्रम मोडल्यास तो तिसऱ्या क्रमांकाचा कर्णधार होऊ शकतो. हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या या तिसऱ्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.