दर दहा वर्षांनी देशात जनगणना केली जाते. या जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना जुंपले जाणार असून, 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर या कालावधित जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु होणार आहे. तर 1 मे ते 15 जुन या कालावधित पहिल्या टप्प्यातील कामांचा भार शिक्षकांवर असणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मे महिन्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. जनगणना अधिकाऱ्यांतर्फे शिक्षणविभागांना त्या संदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटीसींवर शिक्षकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्र शिक्षण परिषदेने या निर्णयाचा निषेध करत ही नोटीस मागे घेण्यात यावी अशी मागणी केली आहेत. 2021 च्या जनगणनेसाठी केंद्र सरकार, राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसह, खाजगी विभागातील शिक्षक आणि इतर कर्मचारी अशा जवळपास देशातील 33 लाख लोकांची नेमणुक या कामासाठी करण्यात येणार आहे. देशाची ही 16 वी जनगणना आहे.
शिक्षकांच्या समस्या
शिक्षकांना वर्षाला एकून 76 सुट्ट्या असतात. जनगणनेच्या कामामुळे मे महिन्याच्या सुट्टया रद्द केल्यास शिक्षकांच्या 39 सुट्ट्यांचे नुकसान होणार आहे. शिक्षकांना वर्षभर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्ह्यापरिषद यांसारख्या निवडणुकीच्या कामांना जुंपले जाते. सरकारी काम असल्याने त्यांना ऑर्डर निघाल्यावर ती कॅन्सल सुद्धा करता येत नाही. निवडणुकांच्या आधी वर्षभर मतदान यादी, नवीन मतदार नोंदणीच्या कामांना शिक्षकांना जुंपेल जाते. नविन अभ्यासक्रमाच्या ट्रेनिंग, 10वी, 12वी बोर्ड परिक्षांचे सुपरविजन, पेपर तपासणी, रिझल्टचे कामकाज यामुळे शिक्षकांवर आधिकच कामाचा ताण असतो. जनगणना ही किचकट कामकाज प्रक्रिया असते, त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जगातील सगळ्यात मोठी जनगणना
2021 ची भारतातील सगळ्यात मोठी जनगणना ठरणार आहे. या जनगणनेत केवळ लोकांची गणना होणार नसुन, त्यांची आर्थिक, शैक्षणिक, जातीय म्हणजेच धार्मिक स्थिती या सगळ्याचा मोठा डाटा जमा केला जाणार आहे. याआधी कागदावर करण्यात आलेल्या जणगणनेला आता डिजिटल स्वरुप आल आहे. 140 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल अॅपद्वारे माहितीचे संकलन केले जाणार आहे. दरम्यान, लोकांना स्वतहला आपल्या अॅड्रॉइड मोबाईल वरुन स्वतच्या जणगणना माहितीचा फॉम भरता येणार आहे.
पहिल्या टप्प्यात घरांना क्रमांक देणे, याद्या बनवणे, गट पाडणे यांसारखी काम केली जाणार आहेत. तर 9 फेब्रुवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया पुर्ण होईल. त्यानंतर त्रुटी आणि उर्वरित कामाकाजासाठी वेळ दिला जाणार आहे, आणि अंतिम आकडेवारी मार्च मध्ये जाहिर करण्यात येईल.