‘IPL’च्या आगामी तेराव्या हंगामातील सामन्यांची वेळ आणि अंतिम सामनाबद्दल आयपीएल गव्हर्निग काऊन्सिलच्या बैठकीत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या हंगामाला 29 मार्च रोजी सुरूवात होणार असून 24 मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. तर अंतिम सामन्याचा मान मुंबईला मिळाला आहे. मागील म्हणजेच 2019ला मुंबई इंडियन्स टीमने चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करत आपल्या नावे चौथ्या विजेतेपदाची नोंद केली होती.
IPL च्या या तेराव्या हंगामात पुन्हा एक रोहितच्या नेतृत्वाखाली विजेतेपद आपल्या नावे करण्याची मुंबई इंडियन्सकडे संधी आहे.
IPL Finals on May 24
24/5/2009 – DC vs RCB
24/5/2015 – MI vs CSK
24/5/2020 –Rohit Sharma Part of both matches!
— CricBeat (@Cric_beat) January 27, 2020
हिटमॅन रोहित शर्माने 2009 साली डेक्कन चार्जर्स आणि 2015 साली मुंबई इंडियन्स टीमकडून खेळताना विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने 24 मे या तारखेलाच खेळले गेले होते. त्यामुळे यंदाच्या सामन्याच काय होत? हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
आतपर्यंत मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 अशा एकूण चार हंगामात विजेतेपद पटकावले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीमच्या आणि रोहितच्या येत्या हंगामाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.