Ads
बातम्या

‘टाटा स्काय’वर पाहता येणार HD चॅनल्स

डेस्क desk team

डीटीएच सर्विस पुरवणाऱ्या टाटा स्काय यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सेट-टॉप बॉक्सची किंमती 100 रुपयांनी कमी केली. त्यानंतर आता पुन्हा अधिक HD चॅनल्स पाहण्याची संधी मिळणार आहे.

सध्या टाटा स्काय सर्वाधिक एचडी चॅनल्स ऑफर करणारे एकमेव डीटीएच प्रोव्हायडर आहे. त्यानंतर डिश टिव्ही, एअरटेल डिजिटल टिव्ही आणि सन डायरेक्ट यांचा क्रमांक येतो. टाटा स्काय 100 मधील 91 चॅनल्स एचडी मधून युजर्सला ऑफर करतात. डिश टीव्ही त्यांच्या युजर्सला 70HD चॅनल्स, Sun Direct हे 75HD चॅनल्स ऑफर करतात.

मात्र टाटा स्कायच्या संपूर्ण चॅनल बाबत बोलायचे झाल्यास एकूण 589 SD चॅनल्स देतात. सर्विस प्रोव्हाइडरच्या दृष्टीने पाहिल्यास बाजारात एअरटेल डिजिटल टीव्ही अव्वल स्थानी आहे.दक्षिण भारतीय नागरिकांसाठी सन डायरेक्ट सुविधा पुरवली जाते. टाटा स्कायने अलीकडेच आपले वॉच पोर्टलही बाजारात आणले आहे.

या वॉच पोर्टलवर, वापरकर्ते थेट टीव्ही तसेच टाटा स्कायच्या डीसीएचएच सेवेमध्ये ऑफर केले जाणारे चित्रपट आणि इतर कंटेंट पाहू शकतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: