सध्या देशात ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. भिम अॅप, गुगल पे, फोन पे, ऑनलाईन बॅंकिंग अॅप द्वारे व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अशातच आता एटीम कार्ड नसताना देखील तुम्ही पैसे काढु शकणार आहात. भारतीय स्टेटबॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेने त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. एसबीआय ग्राहकांना YONO अॅपचा वापर करुन एटीएम मधुन पैसे काढता येणार आहे. तर आयसीआयसीआय बॅंकेच्या ग्राहकांना आय नावाच्या मोबाईल अॅप वरुन विना एटीएम पैसे काढणे शक्य होणार आहे.
एसबीआय ग्राहकांना असे काढता येणार पैसे
एसबीआया बॅंकींग धारकांना ही सुविधा वापरण्यासाठी सगळ्यात आधी योनो अॅप आपल्या मोबाईमध्ये डाऊनलोक करावा लागणार आहे. हा अप डाऊनलोड केल्यानंतरर एक सहा अंकी तुमचा सिक्युरीटी की म्हणजेच एम पीन सेट करणे गरजेचे आहे. यानंतर अॅप मधील योनो कॅश या पर्यायालर क्लिक करुन एटीम मशीन वर तुम्हाला काढयची असलेली रक्कम टाकावी लागेल. रक्कम टाकण्या आधी विना एटीएम कार्ड एटीएम स्क्रीन वरील पर्याय़ ग्राहकांना निवडायचा आहे. त्यानंतर महत्वाचे म्हणजे तुमच्या एटीएमचा चार अंकी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. बॅंकेकडुन तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर योनो कॅश ट्रान्झेक्शन नंबर येईल. तो टाकला की तुम्हाला खात्यातून रक्कम काढता येणार आहे. सध्या अशा प्रकारे अॅपने पैसे काढण्यासाठी एसबीआय ग्राहकांना बॅकेने 500 ते 10 हजार रुपयांची मर्यादा घालून दिली आहे.
आयसीआयसीआय़ साठी
दरम्य़ान, आयसीआयसीआय बॅंकेच्या खातेधारांना देखील बॅंकेने सांगितलेला आय हा अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे. मात्र एसबीआय पेक्षा आयसीसीची मर्यादा 5 हजाराने अधिक म्हणजे 15 हजार ठेवण्यात आली आहे. अॅपवर जाऊन लॉगिन करुन ATM Cashu Amount Widrow म्हणजेच रोख रक्कम काढा यावर क्लिक करा. तुमचा तुमचा खाते क्रमांक टाक, त्यानंतर मोबाईल नंबर टाका. त्यावर बॅंकेकडून तुम्हाला चार अंकी एक पीन येईल तो टाकून तुम्ही पैसे काढु शकता.