जगातील अनेक ठिकाणांबाबत आपल्याला कुतुहल असते. जगात अनेकांसाठी रहस्य असलेली ही पाच अज्ञात ठिकाणे आहेत.आज या ठिकाणांची माहिती आपण जाणून घेऊ…
फ्रान्स : फ्रान्समधील लसकस येथे 20 हजार वर्षे जुनी गुहा आहे. त्यात आदिमानवांनी काढलेली हजारो छायाचित्रे जतन करण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. तसेच या गुहेत धोकादायक कीटक असून गुहा जुनी असल्याने ती पडण्याची भीती आहे.
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामधील हर्ड बेट हे जागृत ज्वालामुखीचे बेट आहे. या बेटावर अनेक जागृत ज्वालामुखी असल्याने त्यातून लाव्हारस बाहेर पडतो. त्यामुळे या क्षेत्रात जाण्यास मनाई आहे.
जपान : जपानमधील शिंटो येथील ‘द ग्रेड श्राइन ऑफ आईज’ मंदिरात पुजारी आणि राजघराण्यातील व्यक्तींनाच प्रवेश मिळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक 20 वर्षांनी मंदिर पाडून नवीन बांधले जाते.
नॉर्वे : नॉर्वेतील एका अतिथंड ठिकाणी जगातील विविध वनस्पती, वृक्ष, प्राणी यांची बीजे जतन करून ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून हे करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त तेथील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळतो.
व्हॅटिकन सिटी : व्हॅटिकन सिटीच्या गोपनीय पुस्तक संग्रहात फक्त पोप आणि काही खास मान्यवरांना जाण्याची परवानगी आहे. या संग्रहात जुनी धार्मिक पुस्तके, दस्तावेज आणि कागदपत्रे ठेवली आहेत.