Ads
बातम्या

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

suresh vadakar
डेस्क बातमीदार

आपल्या सुरेल आवाजातील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला वाडकरांना भारत सरकारकडुन पदमश्री पुरस्कर जाहिर झालाय. मराठी आणि हिंदीत वाडकरांनी अनेक गाणी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली. वाडकरांच्या आवाजातील अनेक भक्ती गितांनी श्रोत्याना अक्षरशाहा मोहिनी घातली. आज भारत सरकारच्या तिसऱ्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पदमश्री पुरस्करासाठी निवड झालेल्या वाडकरांनी याचे श्रेय देताना लता मंगेशकर, आशा भोसले यांना श्रेय दिले.

10 व्या वर्षांपासून संगीत प्रवास

कोल्हापुरात जन्मलेल्या वाडकरांनी वयाच्या 10 व्या वर्षापासूनच संगीत शिकायला सुरवात केली. गुरु पंडित जियालाल यांच्याकडुन त्यांनी संगिताचे धडे घ्यायला सुरवात केली. राजश्री प्रोडक्शनच्या पहेली चित्रपटातून टपुर- टुपुर या गाण्यासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. यानंतर 1981 ला क्रोधी चित्रपटात त्यांनी जेष्ठ गायीका लता मंगेशकर यांच्यासोबत प्यासा सावन, मेघा रे मेघा रे गाण्याने त्यांचा यशस्वी प्रवास सुरु झाला. 1982 साली ‘प्रेम रोग’ या चित्रपटातील मेरी किस्मत में तु नही शायद आणि मै प्रेम रोगी हु ही त्यांची गाणी सुपर हिट झाली. यानंतर ऋषि कपुर यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी वाडकरांना प्राधान्य दिले जाऊ लागले.

भक्ती गितांची नशा

चित्रपटांबरोबरच वाडकरांच्या भक्ती गितांनी लोकांना अक्षरशाहा मोहिनी घातली. त्यांच्या आवाजातील ओम कार स्वरुप, विठ्ठल आवडी ही भक्ती गित अक्षरशाहा आईकणाऱ्यांना त्या भावविश्वात घेऊन जातात. वाडकरांनी आत्ता पर्यंत असंख्य गाणी गायली असून, त्यांच्या योगदाना साठी त्याना महाराष्ट्रसरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे, तर सिंधु ताई सपकाळ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी भारतसरकारने पदमश्री पुरस्कारासाठी त्यांची निवड केली असून, बातमीदार तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: