26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये भव्य परेडचे आयोजन करण्यात येते. देशभरातून लोक परेड बघण्यासाठी जात असतात.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या काही खास ठिकाणांना नक्की भेट द्या.
▪ लाल किल्ला आणि इंडिया गेट : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील परेडसोबतच या दिवशी लाल किल्ला आणि इंडिया गेटला देखील तुम्ही भेट देऊ शकता.
▪ नॅशनल वॉर मेमोरियल : इंडिया गेट जवळीलच नॅशनल वॉर मेमोरियलला नक्की भेट द्यायला हवी. अनेक राज्यांमध्ये युद्ध स्मारक आहे, मात्र राष्ट्रीय स्तरावरील हे पहिले युद्ध स्मारक आहे.
▪ जालियनवाला बाग मेमोरियल, (पंजाब) : जालियनवाला बागमध्ये 11 एप्रिल 1919 ला जनरल डायरने बेछुट गोळ्या झाडून अनेक नागरिकांना मारले होते. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे.
▪ चंद्रशेखर आझाद पार्क, (प्रयागराज) : प्रयागराजच्या कंपनी गार्डनमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद पार्क आहे. या पार्कला अल्फ्रेड पार्क देखील म्हटले जाते. येथेच 27 फेब्रुवारी 1931 ला इंग्रजांच्या सैन्यांनी स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांना घेरले होते. यावेळी आझाद यांनी शरणागती न पत्करता स्वतःला गोळी मारली होती.
▪ झांशीचा किल्ला, (उत्तर प्रदेश) : राणी लक्ष्मीबाईच्या साहसाचे प्रतिक असलेल्या या किल्ल्याला प्रजासत्ताक दिनी नक्की भेट द्यावी.
▪ कारगिल वॉर मेमोरियल : कारगिल वॉर मेमोरियलची स्थापना भारतीय सैन्याने कारगिल युद्धानंतर केली होती. मेमोरियलच्या एका भितींवर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची नावे लिहिण्यात आली आहेत.
▪ नेताजी भवन, (कोलकाता) : कोलकातमधील नेताजी भवनात स्वातंत्र्य सैनिक सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर समर्पित एक स्मारक आणि संशोधन केंद्र आहे. हे भवन 1909 ला बोस यांच्या वडिलांनी उभारले होते.
▪ साबरमती आश्रम, (अहमदाबाद) : या आश्रमातून महात्मा गांधी यांनी मीठाचा सत्याग्रह आणि दांडी यात्रेची सुरूवात केली होती. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे.
▪ वाघा बॉर्डर, (अमृतसर) : पंजाबच्या वाघा बॉर्डरवर दररोज सुर्यास्ताच्या आधी रिट्रीट सेरिमनी होते. यामध्ये भारत व पाकिस्तानचे जवान सहभागी होतात.
▪ सेलुलर जेल, (अंदमान निकोबार) : अंदमान निकोबर बेटावरील सेलुलर जेलला काळेपाणी म्हणून ओळखले जाते. हे जेल एक म्यूझियम आणि स्मारक आहे. या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही नक्की भेट देऊ शकता.