Ads
बातम्या

आज ‘मरे’वर रात्रकालीन ब्लॉक जाहीर; जाणून घ्या लोकलचे बदलते वेळापत्र

Mega Block
डेस्क desk team

रेल्वे प्रशासन तांत्रिक कामांसाठी लोकलवर ब्लॉक जाहीर करत असतात व त्या दरम्यान कामे पूर्ण करतात. मात्र, आज मध्य रेल्वे मार्गावरिल नवीन सार्वजनिक पादचारीपुलाकरीता गर्जर्सच्या लाँचिंगसाठी शीव व कुर्ला स्थानकादरम्यान रात्र कालीन ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक मध्यरात्री 1 ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

सदर ब्लॉक दरम्यान रद्द किंवा दुसऱ्या लेनवर वळविणाऱ्या आणि मेन लाईन आणि हार्बर लाईन वरील गाड्या किती वाजता सुटणार याचे वेळापत्रक मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यावर एक नजर टाकूयात…

मेन लाईनवरील वेळापत्र

  • कर्जतसाठी सीएसएमटी येथून सुटणारी मेन लाईनची शेवटची लोकल 00.25 वाजता सुटेल
  • सीएसएमटीसाठी ठाणे येथून मेन लाईनवरची शेवटची अप लोकल 00.23 वाजता सुटेल
  • कर्जतसाठी सीएसएमटी येथून सुटणारी मेन लाईनची पहिली लोकल सकाळी 4.48 वाजता सुटेल
  • सीएसएमटीसाठी ठाणे येथून मेन लाईनची पहिली अप लोकल सकाळी 4.56 वाजता सुटेल

हार्बर लाईनवरील वेळापत्र

  • पनवेलसाठी सीएसएमटी येथून सुटणारी शेवटची डाऊन लोकल 00.24 वाजता असणार आहे.
  • पनवेलसाठी सीएसएमटी येथून पहिली लोकल सकाळी 4.52 वाजता सुटेल.
  • सीएसएमटीसाठी पनवेल येथून पहिली अप लोकल 4.29 वाजता सुटेल.

लांब पल्ल्याच्या रद्द गाड्या

  • 25 जानेवारीची भुसावळ-सीएसएमचटी पॅसेंजर
  • 26 जानेवारीची सीएसएमचटी-भुसावळ पॅसेंजर
  • 26 जानेवारीची साईनगर शिर्डी-सीएसएमटी एक्स्प्रेस
  • 26 जानेवारीची सीएसएमटी- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस

या लांब पल्ल्याच्या गाड्यांच वेळापत्रात बदल

  • सीएसएमटी येथून सकाळी 7.10 वाजता सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सकाळी 10 वाजत सुटेल.
  • सीएसएमटी येथून सकाळी 8.05 वाजता सुटणारी सीएसएमटी-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस सकाळी 10.30 वाजता सुटेल.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: