Ads
समीक्षण

Movies Review: Street Dancer 3D; डान्ससोबत इमोशनचा तडका

डेस्क desk team

गेले काही महिन्यांपासून चर्चेत असणारा अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट एबीसीडी’, ‘एबीसीडी 2’ या चित्रपटांच्या मालिकेतील तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात वरूण आणि श्रद्धासह नोरा फतेही, प्रभूदेवा हे कलाकारही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट मागील दोन चित्रपटाप्रमाणेच डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांनी दिग्दर्शित केला आहे. रेमो डिसूजा उत्तम डान्स कोरिओग्राफर असले तरी नेहमीच आपल्या चित्रपटातून उत्तम गोष्ट सांगण्याचा प्रयत्न ते नेहमी करत असतात. ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मध्ये डान्स आहेच पण त्यासोबत इमोशन्ल टच ही योग्य प्रकारे देण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा चित्रपट नवीन असला तरी त्याचा गाभा हा जुन्हाच आहे. गल्ली बोलातील तरूण पिढी आणि त्यांच्या अंगी असणारे नृत्य कौशल्य. या चित्रपटाची संपूर्ण कथा ही डान्स भोवती फिरणारी आहे. मागील दोन भागांच्या तुलनेत फरक म्हणजे हा चित्रपट सातासमुद्रा पार म्हणजेच लंडनमध्ये गेला आहे. कथे बद्दल सांगायचे झाले तर सहेज (वरूण धवन) आपल्या कुंटुंबासोबत लंडनला राहत असतो. पण तो मुळचा भारतीय आहे. सहेजला त्याच्या भावाचे म्हणजेच इंदरचे (पुनित) डान्सचे स्वप्न पूर्ण करायचे असते. त्यासाठी सहेज भारतात येऊन पैसे कमवतो आणि लंडनमध्ये डान्स स्टुडिओ उघडतो. पण त्याच्या स्टुडिओ असलेल्या गल्लीतच पाकिस्तानी डान्सर्सची ‘रूल बेकर’ ही टीम असते. त्यांची प्रमुख इनायत (श्रद्धा कपूर) असते. त्या दोन टीममधील टशन चित्रपटात पाहायला मिळत आहे. या डान्स ड्रामासोबत राम प्रसाद (प्रभूदेवा) इमोशन ट्रॅक कथेला जोडतो. भारतीय आणि पाकिस्तानी एकत्र येऊन एका सत्कर्म ध्येयासाठी काय काय आणि कसे करतात हा सिनेमाचा उत्तरार्थ बघण्याजोगा आहे. सहेज आणि इनायत जे एकमेकांच्या विरुद्ध डान्स करत होते ते एकत्र एका संघात डान्स का करतात? त्यामागचे नेमके कोणते ‘कारण’ आहे? हे जाणून घेण्यासाठी ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा चित्रपट पाहावा लागेल.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल

सदर चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर वरूण आणि श्रद्धाने आपली भूमिका योग्यरित्या साकारली आहे. पुनित, राघव, धर्मेश, सलमान युसुफ खान यांसह इतर कलाकारांनी डान्ससोबत अभिनयातही बाजी मारली आहे. नोरा फतेहीने ‘हाय गर्मी’ या गाण्यावर जबरदस्त नृत्य केले आहे. मात्र, काही ठिकाणी चित्रपटातील संवाद फिके पडल्याचे दिसते. पण ज्यांना डान्स आवडत असेल त्यांच्यासह इतरानाही आवडणारा हा चित्रपट आहे.

चित्रपटाला स्टार
3

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: