अभिनेता राजकुमार राव हा लवकरच आपल्याला एका क्रिडा शिक्षकाच्या भूमिकेत आगामी सिनेमात दिसणार आहे.त्याचा आगामी चित्रपट छलांगमध्ये तो ही भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. राजकुमार रावने या सिनेमाचे पोस्टर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे.
Lambi #Chhalaang Ke Liye, Lambi Neend Zaroori Hai!
Releasing on 13th March.@ChhalaangFilm @mehtahansal @NushratBharucha @Mdzeeshanayyub @saurabhshukla_s @satishkaushik2 @ajaydevgn @luv_ranjan @gargankur @itsBhushanKumar @ADFFilms @LuvFilms @Tseries pic.twitter.com/2bXr8ZCFIi— Rajkummar Rao (@RajkummarRao) January 24, 2020
सिनेमाचे पोस्टर
या पोस्टरमध्ये राजकुमार राव हा थकून भागून झोपलेला दिसत आहे. त्याच्या डोक्याखाली उशी म्हणून त्याने फुटबॉल घेतला असून त्याचे विद्यार्थी फार आशेने त्याच्याकडे पाहात आहेत. या पोस्टरमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा देखील असून ती देखील नेहमी पेक्षा वेगळ्या अवतारात पाहायला मिळत आहे.
पोस्टर शेअर करताना राजकुमारने त्यासोबत ‘मोठी झेप घेण्यासाठी, मोठी झोप घेणे गरजेचे आहे’ असे कॅप्शनही दिले आहे. हा सिनेमा 13 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.