Ads
बातम्या

Trans Harbour AC Local : ‘या’ दिवसापासून प्रवाशांच्या सेवेत होणार रुजू; जाणून घ्या तिकीट दर

डेस्क desk team

पश्चिम रेल्वेनंतर आता ट्रान्स हार्बर मार्गावरही प्रतिक्षित असलेली एसी लोकल जानेवारी महिना अखेरीपासून धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून 30 जानेवारीला या मार्गावरिल एसी लोकलचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या लोकलच्या ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल आणि ठाणे-नेरूळ अशा दिवसातून 16 फेऱ्या होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाणे ते वाशी दरम्यान प्रवास करण्यासाठील प्रवाशांना 130 रूपये तर ठाणे-पनवेल मार्गावर प्रवास करण्यासाठी 175 रूपये मोजावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार; येत्या 27 ते 30 जानेवारीला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी बेंगरूळ, दिल्ली आणि मुंबई येथे विविध कार्यक्रमांसाठी जाणार आहेत. या दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरिल लोकलचे उद्घाटन करण्यात येणार असून उद्घाटनाची पहिली फेरी पनवेल ते वाशी चालविण्यात येणार आहे. तर 31 जानेवारीपासून ही एसी लोकल नियमित फेऱ्या धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सदर एसी लोकलची 2019 मध्येच चेन्नई मधून डिलेव्हरी करण्यात आली होती. या लोकलची चाचणी कल्याण-बदलापूर, सीएसएमटी-कल्याण या मार्गावर चालू होती. तर अखेर ही एसी लोकल महिना अखेरीस प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: