भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
उप व्यवस्थापक (Law) साठी 45 जागा, क्लरिकल कॅडरमधील आर्मोरर साठी 29 जागा, वरिष्ठ विशेष कार्यकारी (Data Analyst) साठी 1 जागा, वरिष्ठ कार्यकारी (Statistics) साठी 1 जागा, संरक्षण बँकिंग सल्लागार (Navy & Air Force) साठी 2 जागा, मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार साठी 2 जागा, मानव संसाधन विशेषज्ञ (Recruitment) साठी 1 जागा, व्यवस्थापक (Data Scientist) साठी 10 जागा, उप व्यवस्थापक (Data Scientist) साठी 10 जागा आणि उप व्यवस्थापक (System Officer) साठी 5 जागा अशा एकूण 106 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे प्रमाणपत्र (ii) माजी सैनिक
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह सांख्यिकी/ गणित/ अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी. (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह सांख्यिकी/ गणित/ अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी. (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.5: एअर व्हाईस मार्शल किंवा त्याहून अधिक (डीबीए– एअर फोर्ससाठी) किंवा रियर एडमिरल किंवा त्याहून अधिक (डीबीए– नेव्हीसाठी) च्या पदावर सेवानिवृत्त
- पद क्र.6: मेजर जनरल किंवा ब्रिगेडियर या पदावर निवृत्त
- पद क्र.7: (i) MBA/ PGDM (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Tech/ M.Tech (Computer Science/ IT/ Data Science/ Machine Learning & AI) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) MBA/ PGDM (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 60% गुणांसह B.Tech/ M.Tech (Computer Science/ IT/ Data Science/ Machine Learning & AI) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा
- पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.2: 20 ते 45 वर्षे
- पद क्र.3: 37 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 62 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 60 वर्षांपर्यंत
- पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.8: 26 ते 35 वर्षे
- पद क्र.9: 24 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 24 ते 32 वर्षे
- SC/ST साठी 5 वर्षांची सूट तर OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क
सदर भरतीसाठी General/OBC/EWSच्या उमेदवाऱ्यांना 750 रूपये तर SC/ST/PWD/ExSM च्या उमेदवाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा