राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील हल्दीना येथे वेगळीच शाळा बांधली आहे.या शाळेचा आकार जहाजेचा बांधण्यात आला आहे. ही शाळा पहायला दूरवरून लोक येतात, विद्यार्थ्यांनादेखील या शाळेच्या वर्गामध्ये बसण्यासाठी उत्साही असतात. सहगल फाउंडेशनच्या मदतीने इंजिनिअर राजेश लवानिया यांनी ही शाळा उभी केली आहे.
राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक बनवारीलाल जाट यांनी सांगितले की, शाळेत 6 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शाळेत 400 विद्यार्थी शिकतात.
सहगल फाउंडेशनचे महिपाल सिंह यांनी सांगितले : स्कूलच्या रिनोव्हेशनसाठी साधारण 40 लाख रुपये खर्च आला. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनीदेखील 2 लाख रुपयांची मदत केली.
शाळेविषयी : हल्दीनाच्या या शाळेत बनलेल्या एज्युकेशन क्रुजमध्ये ग्राउंड फ्लोरला स्मार्ट क्लासरूम आहेत. यामध्ये 40 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फर्निचर व भितींवर 55 इंच एलईडी लावला आहे. पहिल्या मजल्यावर एक्टिव्हिटी रूम असून विद्यार्थ्यांना क्रूजच्या टेरेसवर उभे राहण्यास आवडते.