चिकनदुनिया, स्वाईन-फ्ल्यू, झिका, इबोला या आजारांबद्दल सगळ्यांना माहितच असेल मात्र, आता एका नव्या आजाराने संपूर्ण जगभरात भितीचे सावट पसरवले आहे. या आजाराचे नाव आहे ‘कोरोनाव्हायरस’. चीनने या व्हायरसला ‘वूहान’ असे नाव दिले आहे. या व्हायरसमुळे दिल्ली, मुंबई, कोलकत्ता या राज्यांसह इतर राज्यातील विमानतळांनाही अलर्ट जाहीर केला आहे.
आतापर्यंत घेतले ऐवढे बळी
दरम्यान, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच आरेग्य तपासणी करण्यात येत आहे. आता पर्यंत चीनमध्ये या व्हायरसने 9 जणांची बळी घेतला असून 300 जणाना व्हायरसची लागण झाली आहे. परदेशातून येणाऱ्या रूग्णांमार्फत हा व्हायरस भारतात पसण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
व्हायरस आणि त्याच्या लक्षणाबद्दल
सर्वात आधी हा व्हायरस चीनमध्ये 2002 साली पसरला होता. त्यानंतर 2012 साली पुन्हा हा आजार पसरला होता. तर यावेळीही हा आजारांनी डोकवर काढले आहे. चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस हा एका मसळी बाजारातून पसरला आहे. तसेच न्युमोनिया आजारासारखी या व्हायरसची लक्षणे आहे. व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, श्वास घेताना अडथळा येणे, थंडी वाजणे, थकवा, सर्दी, डोके दुखी अशी लक्षणे दिसतात.