गेले अनेक दिवस मनसेच्या अधिकृत ट्विटर हँटलवरून पक्षचिन्हाच्या मागील झेंडा हटवल्यापासून ‘मनसे आता कोणता झेंडा हाती घेणार’ या चर्चेला उधाण आले होते. मात्र, आज अखेर मनसेच्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे.
मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकत होता. पण आज पक्षानी अधिकृतरित्या नव्या झेंड्याची घोषणा करण्यात आलीय. झेंड्याच्या अनावरणाआधी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली व त्यानंतर झेंड्याचे अनावरण करण्यात आले.
कोण आहेत अमित ठाकरे?
राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी मनसे हा पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी मनसेचा झेंड्यावर निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र आज तब्बल 14 वर्षांनी मनसेचा झेंडा बदलण्यात आला आहे.