इआययूने सादर केलेल्या अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार जागतिक लोकशाही सूचीत भारताची 10 अंकांनी घसरण झाली आहे.
सदर यादी 2019 या वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 167 देशांचा समावेश आहे. 2018 साली जागतिक लोकशाही सूचीमध्ये भारताव्या (7.23 गुणासह) स्थानी होता. मात्र 2019 मध्ये भारताला 6.90 गुण मिळाल्याने भारताची 51व्या स्थानावर घसरण झाली आहे.
दक्षिण आशियाई देशांची क्रमवारी – श्रीलंका:691 बांगलादेश:801 पाकिस्तान:108| चीन:153
‘द इकॉनॉमिस्ट’ या वृत्तपत्राच्या ‘इंटेलिजन्स युनिट’दवारे सादर करण्यात आलेल्या या अहवालामध्ये भारतातील ‘नागरी स्वातंत्र्यात घट’ झाल्याने भारताची क्रमवारी घसरल्याचे सांगण्यात आले आहे.
द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट काय करते?
- ही संस्था जगभरातील अनेक देशांमधील राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या संशोधन व विश्लेषणादवारे अहवाल सादर
करते. - या संस्थेने सादर कलेला अहवाल हा त्या देशातील निवडणूक प्रक्रिया, वैविध्य, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग,राजकीय संस्कृती, आणि नागरी स्वातंत्र्य या मुद्दयांच्या आधारे तयार केला जातो.
कशी वाटली माहिती? आम्हाला नक्की कळवा. तसेच अशीच मजेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका…