Ads
ओपन मांईड

हिवाळ्यात जनावरांची घ्या अशी काळजी!

डेस्क desk team

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांना वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या समस्या  टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे गरजेचे असते.

अतिथंडीमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम :

 • दुधाळ जनावर हिवाळ्यात पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतिवरही परिणाम होतो.
 • लहान वासरांना फुफ्फुसदाहापासून संरक्षण मिळावे याकरिता थंडीच्या काळात लहान वासरांकरिता गोणपाटाची झूल तयार करून त्यांच्या अंगावर घालावी. लहान वासरांना झूल बांधल्याने त्यांना उबदार वाटते.
 • थंडी जास्त असल्याने जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे.
 • हिवाळ्यात जनावरांच्या त्वचेला भेगा पडतात. त्यामुळे त्वचा खरबडीत होते व खाज सुटते म्हणून त्यांच्या त्वचेला एरंडीचे तेल किंवा पेट्रोलियम जेली लावावे, जेणेकरून त्वचा नरम राहील व भेगा पडणार नाहीत.
 • अतिथंडीत सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते. अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात किंवा काही जनावरे लंगडतात. शेळ्यांची करडे आणि गाई म्हशीची वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात.

उपाययोजना :

 • थंडी वाढू लागल्यास जनावरे प्रथमतः गोठ्यात बांधावीत. बाहेरील थंड हवा आत येणार नाही याची काळजी घ्यावी गोठ्याच्या खिडकीस रिकाम्या पोत्यांचे किंवा गोणपाटांचे पडदे लावावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत व सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडे ठेवावेत.
 •  जनावरांना थंडीत मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवू नये. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत व शक्य असेल तर इलेक्ट्रिक हिटर लावावे. सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा पिलांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • जनावरांना गोठ्यामध्ये बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भुसाच्या सहाय्याने गादी तयार करावी.
 • जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना गरम-कोमट पाण्याचा वापर करून धुवावे. सकाळचे व सायंकाळचे ऊन गोठ्याची येईल अशी रचना गोठा बांधतांना करावी.
 • सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नये म्हणून ग्लिसरीनचा किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.
 • हिवाळ्यात शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा.
 • पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुण्यासाठी आणि वासरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
 • हिवाळ्यात जनावरे भरपूर पाणी प्यावेत, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्यावे.
 • अति थंडीमुळे बहुवर्षीय चारा पिकांची वाढ हळूहळू होते या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणार्‍या पिकांची लागवड करून चारा उत्पादन करावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
 • गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी व गोठा कोरडा करावा. सकाळचे व सायंकाळचे ऊन गोठ्यात येईल अशी गोठ्याची रचना करावी.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: